25 June 2022 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 35519% रिटर्न | 50 हजाराचे 1 कोटी 78 लाख झाले शिंदेंकडून प्रॉपर्टीवर स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर | पण पक्षासाठी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या नावाचा वापर होणार? भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड
x

फसलेल्या 'मी पुन्हा येईन' टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली | खोचक ट्विट

Shivsena MP Priyanka Chaturvedi, Mi Punha Yein, Devendra Fadnavis

मुंबई, २३ नोव्हेंबर: ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. त्यावर स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ बद्दल खुलासा केला होता.

देवेंद्र फडणवीस यांना, भाजपला अतिआत्मविश्वास नडला का? यावर उत्तर देताना फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं की, ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ लोकांना भावली, त्यामुळे सर्वत्र पसरली. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ ही माझी घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल त्यावेळी म्हटलं होतं.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. राज्यात अचानक नवीन समीकरण जुळलं आणि कट्टर हिंदूत्ववादी शिवसेनेने विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जुना मित्र भाजपसोबत अचानक काडीमोड घेऊन वेगळी वाट धरण्याचं कारणही तसंच होतं. मुख्यमंत्रीपदावर कोणतीही तडजोड होणार नाही, असं विधान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि तिथेच वादाची ठिणगी पडली होती.

दरम्यान, आज २३ नोव्हेंबर २०२०, बरोब्बर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडली होती. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते. मात्र या घटनेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते. त्यालाच अनुसरून शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एक खोचक ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ‘फसलेल्या मी पुन्हा येईन टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली’.

 

News English Summary: Today, 23rd November 2020, exactly one year ago, on this very day, unprecedented political developments took place in the political circles of Maharashtra. Devendra Fadnavis was sworn in as the Chief Minister and Ajit Pawar was sworn in as the Deputy Chief Minister. Therefore, there was a stir in the politics of the country including Maharashtra. However, due to Sharad Pawar’s game, this morning’s government was short-lived. However, this incident had changed the politics of Maharashtra. Following this, Shiv Sena MP Priyanka Chaturvedi has sent a scathing tweet to Fadnavis. In it, he has said, “I will come back after failing.

News English Title: Shivsena MP Priyanka Chaturvedi slams BJP over Mi Punha Yein anniversary News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(691)#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x