7 August 2020 9:42 AM
अँप डाउनलोड

संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल; प्रकृती मात्र स्थिर

MP Sanjay Raut, Shivsena

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. राऊत यांच्या अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लिलावतीमधील ज्येष्ठ हृदयतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर पुढील दोन दिवस उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यासाठी लिलावती रुग्णालयाच्या अकराव्या मजला रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. दरम्यान काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

गेल्या १५ ते १८ दिवसांपासून ते शिवसेनेची भूमिका सातत्याने माध्यमांसमोर मांडत आहेत. अत्यंत आक्रमकपणे संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही भूमिका त्यांनी सातत्याने माध्यमांसमोर मांडली. तसंच शरद पवार यांच्या भेटीगाठीही घेतल्या. अशात आता सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अवघे काही तास उरलेले असताना संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज २-३ पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपला घाम फोडला होता. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दग दग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x