30 April 2025 11:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा
x

भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही - शरद पवार

Shivsena, MP Sanjay Raut, Interview, NCP President Sharad Pawar

मुंबई, १० जुलै : उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली असून त्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिलं आहे.

उद्यापासून ही बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. शरद पवारांच्या या मुलाखतीच्या प्रोमोमुळे उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, बुधवारी या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध झाला. त्यात महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?’ असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुलाखतीचा अजून एक प्रोमो ट्विट केला आहे. त्यात शरद पवार हे मोदी-शहा जोडगोळी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर तोफ डागताना दिसतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अलीकडंच केंद्र सरकारनं दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस दिली होती. त्याबद्दल बोलताना हे क्षुद्रपणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ता ही विनयानं वापरायची असते. सत्तेचा दर्प डोक्यात गेला ती डोक्यात गेली की अशा गोष्टी होतात, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: NCP president Sharad Pawar has said that Uddhav Thackeray’s method of work is Shiv Sena’s method and it is not in Shiv Sena’s interest to hand over power to BJP. Shiv Sena MP Sanjay Raut has interviewed Sharad Pawar in which he has made this statement.

News English Title:  Shivsena MP Sanjay Raut Interview Of NCP President Sharad Pawar News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या