12 May 2025 5:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसाठी संजय राऊत पवारांकडे?

Aaditya Thackeray, Aditya Thackeray, Shivsena, NCP, Sharad Pawar, Sanjay Raut

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र आता या भेटीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आणावे, यासाठी भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती. ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पोट निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीने आदित्य यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात भविष्यात काही नवी समीकरणं पाहायला मिळणार का, याची चर्चा रंगत आहे.

अजित पवारांच्या राजीनाम्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उलथापालथ सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट कौटुंबिक होती, असं राऊत यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मात्र, या भेटीत नक्कीच काहीतरी राजकीय असावं, असे आडाखे बांधले जात होते. त्यात तथ्य असल्याचं सूत्रांकडून समजतं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांचा संभाव्य विधानसभा प्रवेश सुकर व्हावा, यासाठी ही भेट झाली होती. आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. आदित्य हे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातं. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. सध्या शिवसेनावासी झालेले सचिन अहिर हे आधी येथून आमदार होते. अहिर यांनी पक्ष बदलला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा नव्या जोमानं लढवण्याच्या प्रयत्नांत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या