3 May 2025 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ - मंत्री जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad, Corona Crisis, Relief package to Mumbai

ठाणे, १४ मे: कोरोनानं देशाची आर्थिक राजधानी मुंबईला वेठीस धरली आहे. मागील दीड महिन्यांपासून या महानगराची जीवनवाहिनी असलेली लोकल ठप्प आहे. मुंबईतील स्थितीविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही वारंवार चिंता व्यक्त केली असून, मुंबईसमोर कोरोनाबरोबर आर्थिक आव्हानही उभं राहिलं आहे. याच विषयाकडे लक्ष देण्यासाठी राज्याचे गृहविकास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला साद घातली आहे.

चिंतेची बाब म्हणजे चाचण्यांमध्ये देशात पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण सरासरी ३ टक्के असताना मुंबईत हेच प्रमाण १५ टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशातील हॉटस्पॉट असलेल्या महानगरांपैकी मुंबई वरती आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचं चित्र आहे. याकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररूपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होता पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ असल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेनं स्वावलंबी भारताला गती मिळेल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

यानंतर बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजशी निगडीत माहिती सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच आज पुन्हा निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत.

 

News English Summary: Along with Corona, Mumbai is also facing financial challenges. State Home Development Minister Jitendra Awhad has called on the Modi government to pay attention to this issue.

News English Title: State Housing Minister Jitendra Awhad Demands Special Relief Package For Mumbai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या