20 September 2021 1:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
x

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली म्हणणारे आ. भातखळकर आज ? - सविस्तर वृत्त

BJP MLA Atul Bhatkhalkar, Farmers Loan Waiver

मुंबई: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती विषयावरून भारतीय जनता पक्षातील आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सध्या मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी २०१९ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा असाच मुद्दा उचलत आक्रमक पवित्र घेतला होता तेव्हा आमदार अतुल भातखळकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

फडणवीस सरकारच्या काळात याच विषयावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वित्त आयोगाला दोषी ठरवत, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळेच वित्तीय तूट वाढल्याचा धक्कादायक दावा केला होता. तसेच फडणवीस सरकारची पाठराखण करताना भाजपच्या काळातच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला होता.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढत गेली आणि त्यामुळेच राज्यावर आर्थिक हलाखिची वेळ ओढवली आह असं ते म्हंणाले होते. दरम्यान, मागील २०१८ मध्ये वित्तीय तुटीची स्थिती होती, परंतु आता (२०१९ मध्ये फडणवीसांच्या काळात) राज्याच्या महसुलात सुधारणा झाल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.

तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निष्कर्षांवर सुद्धा टीका करताना, वित्तीय आयोगाचे निष्कर्षच चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे मत व्यक्त करत एकप्रकारे वित्त आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आणि फडणवीस सरकारची पाठराखण केली होती. आज तेच भाजप आमदार अतुल भातखळकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र करताना दिसत आहेत.

 

 

News English Summery: Farmers are seeing the aggressiveness of the Bharatiya Janata Party MLA from the entire debt relief issue. At present, BJP MLA Atul Bhatkhalkar in Mumbai had taken up such an aggressive sacrilegious issue during the Fadnavis government in 2019 when MLA Atul Bhatkhalkar had given angry response while interacting with the media.

 

Web Title: Story BJP MLA Atul Bhatkalkar Stand over farmers loan during Fadnavis government.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(678)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x