मुंबई: वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधित ४ रुग्ण आढळले; पोलिसांकडून परिसर सील
मुंबई, ३० मार्च: देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
मात्र आज मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडल्याने मुंबईकरांची झोप उडण्याची शक्यता आहे. वरळीमधील कोळीवाड्यात करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले असल्याने मुबंई पोलिसांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर सील केला आहे. या रुग्णांपैकी कोणतीही परदेश दौरा केला नव्हता अथवा कोणत्याही कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आले नव्हते. तरीही या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या चारही रुग्णांचे वय ५० च्या वर आहे. यातील एक रुग्ण ट्रॉम्बेमधील पीएसयूमध्ये स्वयंपाकाचे काम करत असे. त्यामुळे आम्ही त्यांच्या कर्मचार्यांची चाचणी व तपासणी करुन घेण्यास सांगितलं असल्याचं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितले. तसेच इतर तिघेही स्थानिक नोकर्या करतात आणि जास्त प्रवास करत नाहीत. त्यांना कुणामुळे संसर्ग झालाय सांगता येत नाही असं ते म्हणाले.
विशेष म्हणजे यामधील एकजण ट्रॉम्बे येथे कूक म्हणून काम करत होता. त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे. तर इतर तिघे जण स्थानिक ठिकाणी काम करत असून जास्त प्रवास करत नाहीत. त्यामुळे यांना लागण नेमकी झाली कशी याची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती जी दक्षिण वॉर्डचे महापालिक सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.
News English Summary: However, today Mumbai is likely to fall asleep due to a shocking pattern in Mumbai. Mumbai police have sealed the premises to prevent the outbreak as four suspected coronary patients were found in Koliwada in Worli. None of these patients had visited overseas or had been exposed to any coronas. Yet these people are infected with coronas. All four patients are above 50 years of age. One of these patients was working at a PSU in Trombay. Therefore, we have asked them to test and inspect their employees, ”said Municipal Assistant Commissioner Sharad Ughde. All three also do local jobs and do not travel much. He said they could not say who had been infected.
News English Title: Story corona virus shocking infection spreads in Mumbai Worli Koliwada four new cases have been reported News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News