9 May 2025 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स शेअर देऊ शकतो 23 टक्केपर्यंत परतावा, महत्वाची अपडेट आली - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले, येस बँक शेअर्स रॉकेट तेजीत, अपडेट नोट घ्या - NSE: YESBANK Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं
x

Sunrise Over Ayodhya | सलमान खुर्शीद यांच्या विरोधात बजरंग दल पोलिसात तक्रार करून न्यायालयीन लढा देणार

Sunrise Over Ayodhya

मुंबई, 24 नोव्हेंबर | आपल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना दहशतवादी संघटनेशी केल्याने सलमान खुर्शीद वादात सापडले होते आणि त्यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता आणि तीव्र प्रतिकिया उमटल्या होत्या. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनितालमधील घरावर हल्ला करुन तोडफोड आणि जाळपोळ देखील करण्यात (Sunrise Over Ayodhya) आली होती.

Sunrise Over Ayodhya. Mumbai’s Bajrang Dal district coordinator Gautam Ravariya have decided to lodged a complaint against Congress leader Salman Khurshid directly with the Mumbai Police Commissioner after controversial book :

सलमान खुर्शीद यांनी आपलं पुस्तक ‘Sunrise Over Ayodhya’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात होतं. या हल्ल्यानंतर सलमान खुर्शीद यांनी प्रतिक्रिया देताना हा हिंदुत्ववाद नसल्याचं म्हटलं होते. त्यादरम्यान त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्ला मुलाखतीत हल्ल्यावरुन नाराजी जाहीर केली होती आणि हिंदुत्व काय करायचं पहायचं असेल तर, माझ्या घराचा जळालेला पाहा असं सांगितलं होते.

त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम येथे आयोजित कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले होते. मी हिंदुत्व आणि आयसीस एकच आहेत असं म्हटलं नसून दोन्ही एकसारखे असल्याचं म्हटलंय, असं सलमान खुर्शीद त्यावेळी म्हणाले होते. मात्र अजूनही सलमान खुर्शीद यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

यासंदर्भात भाजपने देखील तीव्र प्रतिकीर्या दिली होती. हिंदूंचा अपमान भारत सहन करणार नाही! काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि रशीद अल्वी यांच्या विरोधात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या, या कारणास्तव घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनी केली होती आणि एफआयआर नोंदवला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

त्यानंतर विश्व हिंदू परिषदेची संलग्न असलेली संघटना बजरंग दल देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील बजरंग दल सहार जिल्हा संयोजक गौतम रावरीया हे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विवादित पुस्तकानंतर त्यांच्या विरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे आणि अंधेरी पूर्व येथील MIDC पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे बजरंग दल मुंबई (सहार) जिल्हा संयोजक गौतम रावरीया हे सलमान खुर्शीद यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देखील देणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sunrise Over Ayodhya Mumbai Bajrang Dal leader Gautam Ravariya will lodge a complaint against Salman Khurshid.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या