3 May 2025 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मेट्रो भवन: फडणवीसांच्या काळात १५ हजार कोटीचा गैरव्यवहार? काँग्रेसकडून कॅगचा पुरावा

Congress Leader Sachin Sawant, Devendra Fadnavis, Mumbai Metro Scam

मुंबई: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळातील घोटाळ्यांबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ आणि २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस सरकारच्या काळातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये टेंडरचा आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. यासंदर्भात काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरबांधणीसाठी सिडकोच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुमारे १४ हजार कोटींच्या निविदा आणि मेट्रो भवनच्या कामाच्या निविदेतील कथित घोटाळा उघडकीस आणला होता. या दोन्ही कामांबाबत ‘कॅग’कडे केलेल्या तक्रारीचा चौकशीचा अहवाल आमच्या आरोपांना पुष्टी देणारा आला असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या कथित घोटाळ्याची चौकशी राज्य सरकारने तातडीने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबई परिसरात ८९ हजार ७७१ घरे बांधण्याचे प्रस्तावित होते. प्रकल्पात त्या चार लोकांना ही कंत्राटे मिळावीत म्हणून निविदेच्या अटी व शर्ती तयार केल्या गेल्या. काँग्रेसतर्फे याबाबत माहिती घ्यायला सुरुवात झाल्यावर निकोप स्पर्धा दाखवण्यासाठी नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनी या पाचव्या कंत्राटदाराला निविदा भरण्यास सांगितले गेले. परंतु त्यांची निविदा बाद करून त्याने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून मेट्रो भवनचे कंत्राट त्यांना देण्याचा घाट घातला गेला आहे व त्यासाठीची निविदा प्रक्रियाही मॅनेज असून त्याच कंपनीला मेट्रो भवनचे कंत्राट मिळाले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट रोजी केला.

काँग्रेसने केलेल्या तक्रारीची ‘कॅग’ने दखल घेतली असून, यासंदर्भातील चौकशीमध्ये ‘कॅग’ला तथ्य आढळले आहे, असा दावा काँग्रेसने केला. एमएमआरडीएतर्फे आलेले स्पष्टीकरण ‘कॅग’ने नाकारल्याचे दिसते, असे सांगत, ‘मेट्रो भवनच्या कामासाठी वाटाघाटी करण्यात येऊन प्रथम ७३ कोटींची किंमत कमी करण्यात आली. नंतर त्या कामाचा प्रकल्प आराखडा बदलून वरचे मजले कमी करून तपशील बदलण्यात आला. यामुळे अजून ११७ कोटी रुपये कमी झाल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारा आहे’, असा गंभीर आरोप सावंत यांनी केला.

कॅगने घेतलेले आक्षेप या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शक आहेत. पंतप्रधान आवास योजना व मेट्रो भवन या दोन्ही प्रकल्पाच्या निविदेत फडणवीस सरकारने भ्रष्टाचार केला आहे हे स्पष्ट असून या दोन्ही कामांना तात्काळ स्थगिती देऊन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्ष सरकारकडे करत आहे असे सावंत म्हणाले. अधिकाऱ्यांवर टाकलेला दबाव व संगनमताने प्रचंड मोठा भ्रष्टाचार तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयातून झालेला आहे हे चौकशीअंती मोठमोठी नावं यातून उघड होतील असे सावंत म्हणाले.

 

Web Title:  Tender scam in Metro building work during former CM Devendra Fadnavis government congress alleges.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या