3 May 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

सेना नगरसेवकाकडून ब्रिटनमधील बोट रुग्णवाहिकेचा फेक फोटो ट्विट | खासदाराकडूनही अभिनंदन

CM Uddhav Thackeray, Shivsena Amey Ghole, MP Priyanka Chaturvedi

मुंबई, १४ ऑगस्ट : रायगडकरांचे स्पीड बोट रुग्णवाहिकेच स्वप्न अखेर पुर्ण होणार आहे. राज्य सरकारने अलिबागमधील मांडवा ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया दरम्यान बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत,अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली ९ ऑगस्ट रोजी दिली होती.

बाह्य यंत्रणेकडून प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी ही स्पीड बोट रुग्ण सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाने ७ ऑगस्टला याबाबातचे आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार बाह्य यंत्रणाकडून निविदा मागवून ही मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यान स्पीड बोट रुग्णवाहिका कार्यान्वयित केली जाणार आहे.

मात्र शिवसेना खासदार आणि नगरसेवक यांच्या या ट्विटमुळे नेटीझन्सने त्यांची खिल्ली उडवली आहे, हा रुग्णवाहिकेचा फोटो ब्रिटनमधला आहे, त्यामुळे ठाकरे सरकारने ही मरीन सेवा ब्रिटनमध्ये लॉन्च केलीय का? असं विचारण्यात आलं. तसेत खरं दाखवण्यासाठी काही नाही म्हणून फेक फोटो दाखवण्यात इंटरेस्ट आहे का? असंही म्हटलं आहे.

शिवसेना नेत्यांनी केलेल्या ट्विटमधील या फोटोचा महाराष्ट्राशी संबंध नाही. हा फोटो ब्रिटीश आयलँडमधील आहे. या बोटीवर फ्लाईंग क्रिस्टीन III असं नाव आहे. हा फोटो अमेय घोले यांनी ट्विट केला आहे. २०१४ मध्ये बीबीसीने या बोटीबाबत एख लेख प्रसिद्ध केला होता. त्यामुळे खासदार प्रियंका चर्तुवेदी आणि अमेय घोले यांनी केलेल्या ट्विटमधील हा फोटो फेक आहे.

 

 

News English Summary: Mumbai Shiv Sena corporator and BMC health panel chairman Amey Ghole has come under fire on Twitter for posting a photo of a marine ambulance belonging to an English Channel island and claiming that it was the state government’s service from Mandwa jetty to the Gateway of India.

News English Title: Thanks to Uddhav Thackeray for showing photo of British ambulance Shiv Sena MP Priyanka Chaturvedi corporator Amey Ghole troll News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या