12 December 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राज ठाकरेंच्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारला जाग | जिम सुरु करण्याची परवानगी मिळणार

Maharashtra Government, Gym ReOpen, Lockdown, Minister Vijay Wadettiwar, Raj Thackeray

मुंबई, १४ ऑगस्ट : राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपाकडून जिम सुरु करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आज जिम सुरु करण्यासाठी सरकार तयार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले आहे.

“राज्यातील जिम सुरु करावी अशी अनेक दिवसांची मागणी होतीच. गेल्या चार महिन्यात जिम व्यावसाय अडचणीत होता. आरोग्याच्या दृष्टीनेही अनेकांच्या समस्या आहेत. म्हणून सरकारने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये या राज्यातील सर्व चालकांना नियमावलीचं पालन करत जिम सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागणीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरेंची मागणीसुद्धा रास्त आहे. ती मागणी योग्य होती. मागणी कोणीही केली तरी सरकार सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेत असतं. फडणवीस, राज ठाकरे यांनी मागणी केली असली तर सरकारने सर्व विचार करुनच निर्णय घेतला आहे. दोन दिवसात यासंबंधी आदेश निघेल” असं ते म्हणाले.

 

News English Summary: The state government has decided to start a gym and will sign the orders today or tomorrow, Vijay Waddetivar said. For the last few days, there has been a huge demand from MNS and BJP for starting a gym.

News English Title: Maharashtra Government Will Allow Gym To Open Says Minister Vijay Wadettiwar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x