20 August 2022 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या MSSC Recruitment 2022 | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 7000 जागांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज करा Multibagger Stocks | धमाकेदार शेअर, दीड वर्षात गुंतवणूक 41 पटीने वाढली, हा स्टॉक भविष्यातही मोठा परतावा देऊ शकतो Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या Mutual Funds | म्युचुअल फंड योजनेत दरमहा फक्त 1000 रुपये जमा करा, 2 कोटींहून अधिक परतावा घेऊ अर्थसंपन्न व्हा
x

कुठेही न जाता, न फिरता देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवड झाली – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray. Interview Saamana Newspaper, MP Sanjay Raut

मुंबई, २५ जुलै : शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राज्यातले राजकारण चांगलेच तापले.

फडणवीसांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,’ फडणवीस हे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले होते. फडणवीस हे दिल्लीतील तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील. पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले नाहीत ते. दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत.’ असा सणसणीत टोला फडणवीसांना लगावला.

मात्र, फडणवीस दिल्लीत जाऊन काय करताहेत याची मला चिंता नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मला चिंता नाही. बाकी फडणवीस हे बोलतच राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तसेच राज्य सरकार मुंबईतील कोरोनाची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही उद्धव ठाकरे यांनी फटकारले. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’सारख्या वृत्तपत्रांमध्ये धारावी पॅटर्नचे कौतुक करण्यात आले आहे. तरीही विरोधी पक्षनेते सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप करतात. कदाचित त्यांच्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वैगेरे येत नसेल. नाहीतर आम्ही ‘वॉशिंग्टन पोस्ट’ही मॅनेज केलंय, अशी मिष्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

News English Summary: He may have a stomach ache that, without going anywhere, an organization selected the Chief Minister of Maharashtra as one of the best Chief Ministers in the country. This too can be a stomach ache, said Uddhav Thackeray.

News English Title: Without going anywhere, an organization selected the Chief Minister of Maharashtra as one of the best Chief Ministers in the country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x