12 December 2024 10:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? | युवासेना आंदोलनाच्या तयारीत

Yuvasena secretary, Varun Sardesai, Mumbai police

मुंबई, १२ जानेवारी: राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ले करणं नवं राहिलेलं नाही. यामध्ये सर्वाधिक हल्ले हे रहदारी दरम्यान होतात आणि त्यात वाहतूक पोलीस सर्वाधिक लक्ष होतात. काल पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सीट जात एका वृद्धेला धडक देण्यात आली. यावेळी संबधित तिघांना हटकणाऱ्या पवई पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविण्यात आला. त्यादरम्यान पवई पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे हे जखमी झाले.

याप्रकरणी सचिन तिवारी नामक इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर मुख्य आरोपी दिपू तिवारी व आयुष राजभर यांचा शोध सुरू असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून हे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याच आरोपी कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम यांचा पोलिसांना कॉल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

यानंतर राम कदम यांनी पोलिसांना फोन करुन आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. “मी हल्ल्याचं समर्थन करत नाही. पण हा त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं अजून लग्नही झालेलं नाही. माणुसकीच्या नात्याने आणि त्यांच्या भविष्याचा विचार करता आपापसातही हे प्रकरण मिटलं असतं. तुम्ही इच्छा असेल तर कानाखाली मारा,” असं राम कदम सांगत असल्याचं ऐकू येत आहे.

राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे. तर भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे, असा सवाल युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विचारला आहे.

“मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजपा कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ? भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये!”, असे ट्विट वरुण सरदेसाई यांनी केले आहे.

 

News English Summary: After Ram Kadam’s call to the police to release the accused, Yuvasena is preparing to stage an agitation in Mumbai today. Yuvasena will hold agitation at various places in Mumbai at half past noon. Yuvasena secretary Varun Sardesai has asked why the BJP is so angry with its Mumbai police on its Twitter account

News English Title: Yuvasena secretary Varun Sardesai criticised BJP over attack on Mumbai police news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x