4 May 2025 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Birla Mutual Fund | 5 अप्रतिम म्युचुअल फंड योजना, 1 वर्षात दिला 86 टक्के परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल

Birla mutual fund

Birla Mutual Fund | आज आपण ABSL म्युच्युअल फंडाच्या काही जबरदस्त योजना पाहणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 73 टक्के ते 86 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

ABSL म्युचुअल फंड :
देशातील अनेक मोठ्या दिग्गज कंपन्या म्युच्युअल फंड व्यवसायात आहेत. यापैकी एक अग्रेसर कंपनी म्हणजे आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड. ही कंपनी म्युच्युअल फंड द्वारे अनेक योजना राबवत आहे, ज्यांचे एक्सपोजर कर्ज पुरवठा तसेच इक्विटी गुंतवणूक मध्ये आहे. ABSL म्युच्युअल फंडाच्या अशा काही जबरदस्त योजना आहेत, ज्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 73 टक्के ते 86 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अश्या 5 योजनांची माहिती घेणार आहोत.

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्फ्रास्ट्रक्चर फंड :
ABSL इन्फ्रा फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 86.73 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 1 वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची केलेली गुंतवणूक आज 1.87 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे मूल्य आज 1.57 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक 1,000 रुपये पासून सुरू करता येते, तर किमान SIP गुंतवणूक 1,000 रुपये पासून सुरू करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या निधीची एकूण मालमत्ता 570 कोटी रुपये होती आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 1.80 टक्के आहे. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी सुरू करण्यात आली होती.

आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
ABSL डिजिटल इंडिया फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 78.23 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये 1 वर्षापूर्वी केलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.78 लाख रुपये झाली आहे. तसेच, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे मूल्य 1.67 लाख रुपये झाले आहे. या योजनेत, किमान एकरकमी गुंतवणूक 1,000 रुपये पासून सुरू करता येते. तर किमान SIP गुंतवणूक 100 रुपये पासून सुरू करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडाची मालमत्ता 2,536 कोटी रुपये होती आणि खर्चाचे प्रमाण 1.02 टक्के होते. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी झाली होती.

आदित्य बिर्ला सन लाइफ स्मॉल कॅप फंड :
या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 78.18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये जर आपण एका वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1.78 लाख रुपये झाले असते. तसेच 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य 1.57 लाख रुपये झाले असते. या योजनेत, कमीतकमी 1,000 रुपये गुंतवता येतात, तर SIP मध्ये किमान गुंतवणूक 1,000 रुपयेपासून करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडाची मालमत्ता 3,005 कोटी रुपये होती आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 1.07 टक्के एवढे होते. या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी झाली होती.

आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी फंड :
या इक्विटी फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 77.46 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये एक वर्षापूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आज 1.77 लाख रुपये झाली आहे. त्याच जर तुम्ही 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आता 1.56 लाख रुपये झाले असते. या योजनेत, तुम्ही किमान 500 रुपयांपासून एकरकमी गुंतवणूक सुरू करू शकता, तर किमान 500 रुपयांची एसआयपी सुरु करता येते. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत या फंडची मालमत्ता 843 कोटी रुपये होती आणि त्यांच्या खर्चाचे प्रमाण 0.38 टक्के होते. या योजनेची सुरुवात 30 डिसेंबर 2019 ला झाली होती.

आदित्य बिर्ला सन लाइफ बँकिंग आणि वित्तीय सेवा फंड:
या फंडाने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 73.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये मागील एक वर्षांपूर्वी जर आपण 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य 1.73 लाख रुपये झाले असते. 10,000 रुपयांच्या मासिक SIP गुंतवणुकीचे मूल्य आता 1.49 लाख रुपये झाले आहे. या योजनेत तुम्ही किमान एकरकमी 1,000 रुपये पासून गुंतवणूक सुरू करू शकता, तर किमान SIP गुंतवणूक 1,000 पासून सुरू करता येते. या फंडाची एकूण मालमत्ता 2,183 कोटी रुपये आहे आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यांचे खर्चाचे प्रमाण 1.21 टक्के होते. 14 डिसेंबर 2013 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Birla Mutual Fund amazing schemes has given huge returns to investors on 1 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Birla mutual fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या