
ICICI Mutual Fund | ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड भारतातील एक दिग्गज आणि सर्वात मोठी म्युचुअल फंड कंपनी म्हणून नावाजलेली आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये अनेक लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीचा समावेश होतो. म्युचुअल फंड कंपन्या शेअर बाजारातील आणि गुंतवणूक बाजारातील अनेक गुंतवणूक संधीमध्ये पैसे गुंतवतात, आणि त्यातून मिळणाऱ्या परताव्यातून आपल्या गुंतवणूकदारांना नफा दिला जातो.
किमान 5,000 रुपयेची गुंतवणूक :
ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनी आपल्या गुंतवणूकदारासाठी अनेक गुंतवणूक योजना जाहीर करत असते. अशीच एक नवीन गुंतवणूक योजना बाजारात येणार आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंडने नुकताच निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. या म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी, सुरुवातीला किमान 5,000 रुपयेची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 5000 च्या पटीत अधिक गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंडात गुंतवणूकीची सुरुवात 14 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत हा फंड गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. मागील काही वर्षांच्या परतावा आकडेवारीनुसार, निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड निर्देशांक 2005 च्या सुरुवातीपासून दर वार्षिक 14.15 टक्के या दराने वाढला आहे. जर तुम्ही 2005 साली निफ्टी 50इक्वल वेट इंडेक्स फंडात फक्त 10,000 रुपये गुंतवले असतील, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य ऑगस्ट 2022 पर्यंत 1,03,683 रुपये झाले असते.
निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड :
निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड निर्देशांक गुंतवणूक बजरतील टॉप 5 क्षेत्रांमध्ये कमी केंद्रित आहे. जर आपण निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड निर्देशांकाची तुलना इतर म्युचुअल फंड सोबत केली, तर निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड गुंतवणूक बाजारातील टॉप 5 क्षेत्रांमध्ये कमी गुंतवणूक करत आहे. उदाहरणार्थ, निफ्टी 50 इंडेक्समध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वेटेज सुमारे 11.69 टक्के आहे. HDFC बँक लिमिटेडचे वेटेज 8.37 टक्के आहे. ICICI बँक लिमिटेडचे वेटेज 7.92 टक्के आहे. आणि इन्फोसिसचे 7.02 टक्के वेटेज आहे. त्याचवेळी निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड निर्देशांकात रिलायन्स इंडस्ट्रीजचे वेटेज 1.85 टक्के , HDFC बँकचे वेटेज 1.92 टक्के, इन्फोसिस चे वेटेज 1.77 टक्के, आणि ICICI बँकचे वेटेज 2.17 टक्के नोंदवण्यात आले आहे.
मागील 5 वर्षांमध्ये निफ्टी 50 निर्देशांकापेक्षा जास्त परतावा :
म्युचुअल फंड बाजारात बेंचमार्क निर्देशांक दर त्रैमासिक आधारावर पुन्हा संतुलित केला जातो आणि सहामाही आधारावर पुनर्गठित केला जातो. निफ्टी 50 इक्वल वेट इंडेक्स फंड निर्देशांकाने मागील पाच वर्षांमध्ये निफ्टी 50 निर्देशांकापेक्षा जास्त परतावा कमावला आहे. फंडाच्या सुरुवातीच्या वेळी, ICICI प्रुडेन्शियल AMC चे प्रमुख म्हणाले होते की गुंतवणूक बाजारात वेगवेगळ्या परिस्थितीत दर्शक निर्देशांक वेगवेगळे कार्य करतात. हे सर्व त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवणूक करताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.