
Motilal Oswal Mutual Fund | गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा मिळवून दिला आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमाने गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. एसआयपीचे व्याजदर जास्तीत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती देखील SIP गुंतवणुकीकडे वळाले आहेत.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड
या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या फंडातून ‘मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने’ गुंतवणूकदारांना घसघषित परतावा मिळवून दिला आहे. या फंडाने गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर 24.7% वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा SIP गुंतवणुकीचा असून, 19.89% एक रक्कम गुंतवणुकीतून दिले आहेत.
एका वर्षात फंडाने किती पैसे कमवून दिले :
मोतीलाल ओसवाल या म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडलं आहे. या फंडाने एका वर्षात 50.73%, दुसऱ्या वर्षाला 48.79% तर, तिसऱ्या वर्षाला 33.21% परतावा मिळवून दिला आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाचा सध्याचा एनएव्ही 110.57 वर पोहोचला आहे. जो गुंतवणुकीची चांगली कामगिरी दर्शवतो.
एकरक्कमी गुंतवणुकीबद्दल जाणून घ्या :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडात 10 वर्षाआधी 1 लाखांची रक्कम गुंतवली असती तर, सध्याच्या घडीला त्याचे मूल्य 6,13,521.24 इतके झाले असते. हा एक रक्कमी परतावा चांगल्या गुंतवणुकीचे प्रतीक मानला आहे.
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाला मिळाले फाईव्ह स्टार रेटिंग :
मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या इतका पसंतीच उतरला आहे की, त्याला चक्क 5 स्टार रेटिंग मिळाले आहेत. फंडाच्या एकूण मालमत्तेबद्दल सांगायचे झाले तर, फंडाची एकूण मालमत्ता 22,898 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर फंडाच्या खर्च गुणोत्तराविषयी सांगायचे झाले तर, 1.59% आहे. 2014 रोजी 24 फेब्रुवारी या तारखेला हा फंड लॉन्च करण्यात आला होता. आतापर्यंत फंडाने 5 स्टार रेटिंग मिळवून मजबूत परतावा मिळवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.