 
						Mutual Fund SIP | आजकाल बऱ्याच म्युच्युअल फंडांमध्ये झपाट्याने एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक होताना पाहायला मिळते. बरीच तरुण मंडळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे मानतात.
एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला बाजार मूल्याप्रमाणे आकर्षक परतावा मिळतो. त्याचबरोबर एकीकडे तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा देखील अनुभवायला मिळतो. एसआयपी थोड्याफार प्रमाणात शेअर मार्केटशी जोडलेले असते. समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून 10 हजार रुपये गुंतवले तर, 3.5 करोडोंचा कॉर्पस कसा तयार होईल. याचे कॅल्क्युलेशन पाहूया.
कॅल्क्युलेशन पाहून घ्या :
म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर, 12% अनुमानीत परताव्यासह केवळ 30 वर्षांमध्ये 3.5 करोड रुपयांचा फंड तयार होईल. या पैशांमध्ये तुम्हाला व्याजाने मिळणारी रक्कम 3,16,99,138 परतावा मिळेल. यामधील तुम्ही गुंतवलेली रक्कम 36,00,000 रुपये असेल.
समजा तुम्हाला प्रत्येक वर्षाला 12% नाही तर, 15% अनुमानित परतावा मिळत असेल तर 26 वर्षांमध्ये तुमच्या खात्यात 3.8 करोडोंचा फंड तयार करतात.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर, या गोष्टींची विशेष काळजी घ्या :
तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर, काही विशेष गोष्टींची खास काळजी घेणे गरजेचे आहे. एसआयपीमध्ये मिळणारे रिटर्न तुम्हाला कधीही फिक्स रिटर्न मिळणार नाही. यामध्ये तुम्हाला कमी किंवा जास्त म्हणजे कधी 20% तर कधी 10% रिटर्न देखील मिळू शकते. यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स देखील भरावे लागते. दरम्यान हे टॅक्स देखील आता वाढवण्यात आले आहे. आधी केवळ 10% टॅक्स भरावे लागायचे परंतु आता 12.5% टॅक्स भरावे लागते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		