
Mutual Fund SIP | कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा कमावण्यासाठी संयम राखणे आवश्यक आहे. हीच गोष्ट म्युच्युअल फंडांवर देखील लागू होते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये गुंतवणूकदार कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत मासिक आधारावर गुंतवणूक करत असतो.
भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये एसआयपी गुंतवणूक पद्धत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. एसआयपी गुंतवणूक पद्धत दीर्घकालीन संधी उपलब्ध करून देते. दीर्घकाळ एसआयपी गुंतवणूक केल्याने लोकांना चक्रवाढीचे फायदे घेता येतात. एसआयपी गुंतवणूक पद्धतीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक भरघोस परतावा कमावता येतो.
मासिक 3000 रुपये गुंतवून करोडपती होऊ शकता
तुम्ही म्युचुअल फंड योजनांमध्ये मासिक 3000 रुपये गुंतवून करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये चक्रवाढीचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे.म्युच्युअल फंड SIP करून तुम्ही 5 कोटी रुपये कसे मिळवू शकता, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
समजा जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षांपासून मासिक 3,000 रुपये SIP गुंतवणूक सुरू केली. आणि त्यात वार्षिक 10 टक्के वाढ करत गेलात तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 12 टक्के प्रतिवर्ष दराने तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.
स्मार्ट गुंतवणूक – परतावा तपशील
* प्रारंभिक मासिक SIP : 3,000 रुपये
* गुंतवणुकीचा कालावधी : 35 वर्षे
* अंदाजे परतावा : 12 टक्के
* दर वार्षिक गुंतवणूक वाढ : 10 टक्के
* 35 वर्षांत एकूण गुंतवणूक : 9756877 रुपये
* ठेवींवर अंदाजे परतावा : 4,35,43,942 रुपये
* 35 वर्षानंतर एसआयपी मूल्य : 5,33,00,819 रुपये
* याचा अर्थ 3,000 रुपये मासिक बचतीसह वयाच्या 25 व्या वर्षी SIP गुंतवणूक सुरू करून तुम्ही 35 वर्षांमध्ये मोठा परतावा मिळवू शकता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.