
Mutual Fund SIP | जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. तुम्ही कमीत कमी रुपयात एसआयपीसह म्युच्युअल फंडात आपले पैसे गुंतवू शकता. ICICI Prudential Multi Asset NAV Today
मजबूत परतावा मिळवा
तुम्हीही पहिल्यांदाच एसआयपीमध्ये गुंतवणूक करणार असाल. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. सर्व टिप्स फॉलो करून तुम्हाला दमदार परतावा मिळू शकतो. तसेच तुमचे पैसे बुडण्याची शक्यता ही कमी होते.
गुंतवणूकदार बनले कोट्यधीश
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंड ग्रोथ ऑप्शनने आपल्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण केली आहेत. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची सुरुवात फंड हाऊसने 31 ऑक्टोबर 2002 रोजी केली होती. 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युच्युअल फंडाचा कंपाऊंड एनुअल ग्रोथ रेट (सीएजीआर) 21.21 टक्के होता.
20 वर्षांत मिळाले 1.8 कोटी
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट म्युच्युअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहे. 20 वर्षांत 10,000 रुपयांची एसआयपी वाढून 1.8 कोटी रुपये झाली आहे. फंड सुरू झाल्यापासून गुंतवलेली मासिक 10,000 रुपयांची एसआयपी २० वर्षांत 1.8 कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या पाच वर्षांत फंडाने वार्षिक एसआयपी परतावा 18.48 टक्के दिला आहे. त्यानुसार पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेली 10,000 ची मासिक एसआयपी आता 9.51 लाख होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.