2 May 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

De Nora India Share Price | 4 रुपयाचा चमत्कार! डी नोरा पेनी शेअरने आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 कोटी 23 लाखाचा परतावा

De Nora India Share Price

De Nora India Share Price | सध्या शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास शेअर धारकांना मजबूत परतावा मिळतो. दीर्घ काळात परतावा बंपर परतावा देणारा असाच एक स्टॉक म्हणजे डी नोरा इंडिया. या कंपनीच्या शेअरने काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहेत.

दुसरीकडे, ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी होल्ड केलं, ते लोक आज लखपती झाले आहेत. एकेकाळी या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयांपेक्षा कमी होती. मात्र या शेअरने नंतर 2000 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी डी नोरा इंडिया कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के घसरणीसह 1,765.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअरची किंमत :

25 सप्टेंबर 2001 रोजी एनएसई इंडेक्सवर डी नोरा इंडिया कंपनीचे शेअर्स 3.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये तुफान तेजी आली, आणि 2004 मध्ये शेअरची किंमत 100 रुपयेवर पोहचली. 2005 मध्ये हा स्टॉक 200 रुपयेवर पोहचला. आणि 2006 ते 2016 या कालावधीत शेअरमध्ये असाधारण खरेदी पाहायला मिळाली होती. दरम्यान हा स्टॉक 40 रूपये ते 250 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र, त्यानंतर 2016 मध्ये डी नोरा इंडिया कंपनीच्या शेअरने 300 रुपये किंमत स्पर्श केली. आणि 2018 मध्ये शेअरने 500 रुपये किंमत ओलांडली. 2022 पासून, डी नोरा इंडिया कंपनीच्या शेअरमधे सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे.

एप्रिल 2023 मध्ये डी नोरा इंडिया कंपनीच्या स्टॉकने पहिल्यांदाच 1000 रुपये किंमत पार केली होती. तर जुलै 2023 मध्ये हा स्टॉक पहिल्यांदा 2000 रुपये किमतीच्या पार गेला होता. आता मात्र पुन्हा एकदा स्टॉकची किंमत 2000 रुपयेच्या खाली आली आहे.

डी नोरा इंडिया कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2336.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 586.10 रुपये होती. 28 जुलै 2023 रोजी डी नोरा इंडिया कंपनीचे शेअर्स 2094.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर असताना एक लाख रुपये लावून खरेदी केले होते, त्यांना 25 हजार शेअर्स मिळाले असणार. 2094 या उच्चांक पातळी किमतीनुसार गुंतवणूकदारांच्या 25000 शेअर्सचे मूल्य 5,23,50,000 रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | De Nora India Share Price today on 01 August 2023.

हॅशटॅग्स

De Nora India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x