
Mutual funds| म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही खालील पैकी कोणत्याही म्युचुअल फंडामध्ये 10,000 रुपयांची मासिक एसआयपी केली असती, तर तुम्हाला 30 टक्के परताव्यासह तीन वर्षांत 5.8 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.
सर्वोत्तम कामगिरी करणारे म्युच्युअल फंड :
अनेक ग्रोथ इक्विटी-ओरिएंटेड मिड-कॅप म्युच्युअल फंडांनी मागील 3 वर्षांत जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांत किमान आठ असे मिड-कॅप म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी 30 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर यापैकी कोणत्याही फंडामध्ये तुम्ही फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 30 टक्के परताव्यासह तीन वर्षांत 5.8 लाख रुपये मिळाले असते. इतकेच नाही तर यापैकी दोन मिड-कॅप म्युचुअल फंडांचा अंदाजे वार्षिक परतावा 40 टक्के पेक्षा जास्त होता. या लेखात आपण काही मिड-कॅप फंड ची माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के आणि त्याहूनही अधिक परतावा मिळवून दिला आहे.
या मिड-कॅप म्युचुअल फंडांनी दिलेला परतावा :
1) एडलवाईस मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांस 3 वर्षांत 32.05 टक्के परतावा मिळाला आहे. SIP मध्ये त्याच कालावधीत 30.04 टक्के परतावा मिळाला आहे. हा म्युचुअल फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.
2) कोटक इमर्जिंग इक्विटी फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन योजनेने 3 वर्षांत 31.11 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.47 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.
3) मिरे अॅसेट मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने 3 वर्षात 32.09 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 30.14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा म्युचुअल फंड “निफ्टी मिडकॅप 150” यांचा एकूण परतावा निर्देशांक फॉलो करतो.
4) मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 3 वर्षात 30.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.41 टक्के परतावा मिळवून दिला आहे.हा म्युचुअल फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.
5) पीजीआयएम इंडिया मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षात 44.29 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 41.76 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 परतावा निर्देशांक फॉलो करतो.
6) क्वांट मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅनने मागील 3 वर्षात 40.56 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेत त्याच कालावधीत 37.88 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 परतावा निर्देशांक फॉलो करतो.
7) एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षांत 33.69 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 32.49 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.
8) UTI मिड कॅप फंड :
या योजनेच्या डायरेक्ट प्लॅन ने मागील 3 वर्षांत 30.28 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर SIP योजनेने त्याच कालावधीत 29.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा फंड निफ्टी मिडकॅप 150 चा परतावा निर्देशांक फॉलो करतो.
गुंतवणूक करण्याची योजना :
AMFI च्या ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, निव्वळ प्रवाहाच्या बाबतीत ह्या मिड कॅप फंडचा समावेश टॉप पाच इक्विटी योजनांमध्ये होतो. ऑगस्टमध्ये मिडकॅप फंडातील एकूण गुंतवणूक 1489 कोटी रुपये होती. गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की म्युचुअल फंडाची भूतकाळातील कामगिरी भविष्यातही वाढतीच राहील अशी हमी देत नाही. म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही नेहमी तुमचे संशोधन केले पाहिजे आणि आर्थिक तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.