Mutual Funds | तुम्हाला गुंतवणुकीतून पैसा वेगाने वाढवायचा आहे?, मग ते शक्य करतील या टॉप 5 लार्ज कॅप म्युचुअल फंड योजना

Mutual Funds | चालू आर्थिक वर्ष 2022 मध्ये कोरोनाची भीती कायम असताना दुसरीकडे शेअर बाजारातही मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यावर चांगला परतावा मिळण्याबाबतही बरीच शंका आहे.
तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल किंवा SIP गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही. काही नकारात्मक बातम्यांमुळे किंवा बाजारातील कोणत्याही मोठ्या घडामोडींमुळे झालेली पडझड ही कायमस्वरूपी कधीही नसते किंवा दीर्घकाळ टिकत नाही. परिस्थिती सुधारताच बाजार जबरदस्त रिकव्हरी मोडमध्ये प्रवेश करतो, आणि रॉकेट सारखी उसळी घेतो. अशी घसरण अल्पावधीत हानीकारक ठरू शकते परंतु दीर्घकालीन गुंतवणुकी साठी ही एक उत्तम गुंतवणुकीची संधी आहे.
बाजारात पडझड म्हणजे खरेदीची संधी :
मागील वर्षी कोरोनामुळे शेअर बाजारात मार्चमध्ये कधीही झाली नव्हती अशी घसरण झाली होती. त्या वेळी ज्यां लोकांनी शेअर बाजारात पैसे लावले, त्यांना आज जबरदस्त परतावा मिळत आहे. शेअर बाजारातील याच जबरदस्त तेजीचा फायदा जर तुम्हाला घेता आला नसेल, तर आता म्युचुअल फंडात गुंतवणूक करा.
तुम्हाला शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे कधी ही सोपे राहील. तुमचे पैसे म्युच्युअल फंडातील तज्ञांद्वारे शेअर बाजारात गुंतवले जातात. हे पैसे सखोल संशोधनानंतर कुठेतरी जबरदस्त परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवले जातात. दुसरे म्हणजे, लार्ज कॅप स्टॉक्सप्रमाणे, लार्ज कॅप म्युचुअल फंड देखील बरेच सुरक्षित असतात. कोणत्याही टेन्शनशिवाय आणि जोखीम शिवाय तुम्ही त्यात पैसे गुंतवून तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला सर्वोत्तम 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड योजनांची माहिती देणार आहोत. या सर्व फंडांनी 2021 मध्येही आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
सर्वोत्कृष्ट 5 लार्ज कॅप म्युच्युअल फंड आणि त्यांचा 5 वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा :
1) कोटक ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन : 17.1 टक्के
2) इन्वेस्को लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन : 17.3 टक्के
3) मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन : 18 टक्के
4) बीएनपी लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लॅन : 18.2 टक्के
5) अॅक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन : 21 टक्के
कोटक ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन :
कोटक ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन हा सर्वोत्तम म्युचुअल फंडांपैकी एक असा जबरदस्त फंड मानला जातो. याचा मागील 3 वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा 18.7 टक्के पेक्षा जास्त राहिला आहे. स्थापनेपासूनच या म्युचुअल फंडाचा वार्षिक सरासरी परतावा दर 15.1 टक्के पेक्षा जास्त राहिला आहे. त्याच वेळी, मागील वर्षभरात या म्युचुअल फंड ने तब्बल 26 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
इन्वेस्को लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन :
इन्वेस्को लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन लाँच झाल्यापासून आतापर्यंत दरवर्षी सरासरी 15.8 टक्के या दराने आपल्या गुंतवणूकदारांना परतावा देत आहे. तिचा मागील तीन वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा 18 टक्के होता आणि मगील 1 वर्षाचा परतावा दर तब्बल 30.5 टक्के होता.
मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन :
मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन हा एक टॉपचा लार्ज कॅप म्युचुअल फंड आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड ने दर वार्षिक 17.7 टक्के या दराने आपल्या गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. त्याच वेळी, त्याचा मागील1 वर्षाचा परतावा दे सुमारे 24.2 टक्के होता. आणि मागील 3 वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा दर तब्बल 17 टक्के पेक्षा जास्त होता.
बीएनपी पॅरीबस लार्ज कॅप फंड –डायरेक्ट प्लॅन:
बीएनपी पॅरीबस लार्ज कॅप फंड – डायरेक्ट प्लॅन हा देखील जबरदस्त परतावा देणारा लार्ज कॅप म्युचुअल फंड आहे. स्थापनेपासून ते आतापर्यंत दरवर्षी या म्युचुअल फंडने सुमारे 15.7 टक्के या दराने आपल्या गुंतवणूकदारांना परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, त्याचा मागील 1 वर्षाचा परतावा 21 टक्के आणि मागील 3 वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा 18.2 टक्के एवढा होता.
अॅक्सिस ब्लूचिप फंड – डायरेक्ट प्लॅन :
अॅक्सिस ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन हा म्युचुअल देखील बाजारातील एक नावाजलेला म्युचुअल म्हणून ओळखला जातो. या फंडने स्थापनेपासून ते आतापर्यंत दरवर्षी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 16.8 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, या म्युचुअल फंडाचा मागील 1 वर्षाचा परतावा 19.5 टक्के होता,आणि मागील 3 वर्षांचा वार्षिक सरासरी परतावा 19.1 टक्के नोंदवण्यात आला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Mutual funds large capital investment opportunities on 23 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN