1 May 2025 2:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या

Mutual Funds

Mutual Funds | म्युच्युअल फंड हा सर्वात जास्त लिक्विडीटी असलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. म्युचुअल फंड मधील लिक्विडीटीमुळे, अनेक लोकांसाठी हा पैसे कमावण्याचा आणि चांगला नफा मिळवण्याचा एक पसंतीचा पर्याय आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाच्या प्रकारानुसार, फंड हाऊसकडे रिडेम्प्शन रिक्वेस्ट केल्यानंतर फक्त चार दिवसांत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात परत केले जातात.

म्युच्युअल फंड युनिट्स कसे विकु शकता ?
ओपन-एंड म्युच्युअल फंड योजनेत जी तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला माहित आणे आवश्यक आहे की, तुमच्याकडे असलेली म्युच्युअल फंड युनिट्स अंशतः किंवा पूर्णपणे विकली जाऊ शकतात. म्युच्युअल फंडाची विक्री करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक दिवशी तुम्ही तुमच्या फंड हाऊसला विक्रीची विनंती करू शकता. जर तुम्हाला ती फिजिकल मोडमध्ये विकायची असेल, तर आवश्यक एक ट्रान्झॅक्शन स्लिप असते, ती तुम्हाला फंड हाऊसच्या वेबसाइटवर भेटेल, ती स्लीप डाउनलोड करून तुम्हाला भरावी लागेल, आणि त्यानंतर ती स्लीप फंड हाउसच्या कोणत्याही अधिकृत कार्यालयात जाऊन जमा करावी लागेल. फंड हाऊसच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे तुम्ही म्युचुअल मधून बाहेर पडण्याची विनंती करू शकता. त्यासाठी ऑनलाइन विनंती करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. रजिस्ट्रार किंवा इतर कोणत्याही तृतीय-पक्ष ऑनलाइन पोर्टलद्वारे देखील तुम्ही म्युचुअल फंड मधून बाहेर पडण्याची विनंती करू शकता.

कर आकारणी :
साधारणपणे, सक्रिय इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमध्ये एक्झिट लोड चार्ज म्हणजे त्यातून बाहेर पडण्याचे शुल्क 1 टक्के एवढा असतो. खरेदी केल्यापासून एक वर्षापूर्वी जी तुम्ही तुमची गुंतवणूक रिडीम केल्यास तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावा लागेल. अशा काही म्युचुअल फंड योजना आहेत ज्यात एक्झिट लोड नसलेले लिक्विड किंवा अल्ट्राशॉर्ट टर्म फंड देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे, जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला एक वर्षापूर्वी ते रिडीम करायचा असेल तर ऑनलाईन पर्याय सोपा आहे, आणि 1 टक्के शुल्क त्यावर आकारला जाईल.

पैसे मिळण्यास लागणारा कालावधी :
लिक्विड किंवा डेट-ओरिएंटेड युनिट्सचे रिडीम केलेले पैसे एक ते दोन दिवसात तुमच्या खात्यावर वर्ग केले जातात. इक्विटी म्युच्युअल फंडांसाठी, युनिट्सची पूर्तता केली जाते आणि गुंतवणूकदारांना सहसा चौथ्या दिवशी त्यांची गुंतवणूक रक्कम खात्यात पाठवली जाते. म्युच्युअल फंड मधून काढलेले पैसे थेट गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mutual Funds scheme redemption process and charges on 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

mutual fund(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या