11 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

Rail Vikas Nigam Share Price | सरकारी बँक FD नव्हे, या सरकारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये, गुंतवणुकीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण?

Rail Vikas Nigam Share Price

Rail Vikas Nigam Share Price | ‘रेल विकास निगम’ या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या फोकसमध्ये आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास कंपनीच्या शेअर्सनी मागील 5 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यांत ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 30 रुपयांवरून वाढून 75 रुपयांवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 79.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रेल विकास निगम कंपनी सध्या बातमीत आली आहे, कारण कंपनीला चेन्नई मेट्रो रेल्वे आणि दक्षिण रेल्वेकडून 1,173 कोटी रुपये मूल्याचा कंत्राट मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)

5 महिन्यांत शेअरमध्ये 150 टक्के वाढ :
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 महिन्यांत 155 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी RVNL या सरकारी रेल कंपनीचे शेअर्स 30.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जानेवारी 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 79.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 24 ऑगस्ट 2022 रोजी रेल्वे विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 2.57 लाख रुपये झाले असते.

7 महिन्यांत RVNL स्टॉकमध्ये 170 टक्के वाढ :
RVNL या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील 7 महिन्यांत 170 टक्के मजबूत झाली आहे. बीएसई इंडेक्सवर 20 जून 2022 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जानेवारी 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 79.05 रुपयांवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.15 रुपये होती. तर, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 29 रुपये होती. या सरकारी कंपनीचे बाजार भांडवल 16,440 कोटी रुपये आहे.

कंपनीचा तिमाही नफा : चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत RVNL कंपनीने 4908.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2022 च्या त्याच तिमाहीत कंपनीने 298.58 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत RVNL या सरकारी रेल कंपनीने 4640.75 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, ते याच तिमाहीत कंपनीने 283.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rail Vikas Nigam Share Price 542649 RVNL in focus check details on 14 January 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x