 
						Mutual Funds| मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंड योजना लार्ज कॅप फंडांच्या तुलनेत जास्त परतावा देतात, त्यामुळे गुंतवणूकदार अशा योजनांकडे अधिक आकर्षित होतात. नोव्हेंबर 2022 मध्ये मिड कॅप म्युचुअल फंडांमध्ये 1176.31 कोटी रुपयेचा ओघ आला होता. 2022 या वर्षात लार्ज-कॅप, फ्लेक्सी, ELSS आणि फोकस्ड म्युचुअल फंडांमध्ये मोठ्या प्रमाणात आउटफ्लो पाहायला मिळाला होता. अनेक मिडकॅप म्युचुअल फंड योजना त्यांच्या लॉन्च तारखांपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 मिड-कॅप म्युचुअल फंड योजनांची माहिती देणार आहोत, ज्यानी लाँच झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे.
युनियन मिडकॅप म्युचुअल फंड :
युनियन मिडकॅप फंड या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 47.88 टक्के सरासरी वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडमधील नियमित योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना 45.98 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना S&B BSE 150 मिडकॅप इंडेक्स फॉलो करते.
Mirae Asset Midcap Fund :
Mirae Asset Midcap Fund च्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 27.47 टक्के परतावा कमवून दिला आहे. या म्युचुअल फंडच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणुकदारांना सरासरी वार्षिक 25.61 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड :
मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या डायरेक्ट योजनेने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 21.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 20.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
एडलवाईस मिड कॅप फंड :
एडलवाईस मिड कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 20.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 11.72 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड :
कोटक इमर्जिंग इक्विटी म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.91 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंड योजनेच्या नियमित योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 13.79 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड :
या म्युचुअल फंडच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 17.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड :
SBI मॅग्नम मिडकॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरारी 19.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 16.30 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
UTI मिड कॅप फंड :
UTI मिड कॅप म्युचुअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 19.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 17.63 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
सुंदरम मिड कॅप फंड :
सुंदरम मिड कॅप म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 23.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या थेट योजनेने लोकांना 16.59 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :
निप्पॉन इंडिया ग्रोथ म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 21.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या थेट योजनेने लोकांना वार्षिक सारारी 16.57 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
आदित्य बिर्ला सन लाइफ मिड कॅप फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ मिड कॅप म्युचुअल फंडाच्या नियमित योजनेने सुरुवातीपासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 20.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या म्युचुअल फंडाच्या थेट योजनेने लोकांना वार्षिक सरासरी 15.26 टक्के परतावा मिळवून दिला आहे. ही म्युचुअल फंड योजना निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक फॉलो करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		