24 September 2023 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

SBI Mutual Funds | एसबीआय फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करणारे मालामाल झाले, तुम्हीही करू शकता छप्परफाड कमाई

SBI Mutual Funds

SBI Mutual Funds | आजकाल जी महागाई वाढत आहे, त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर परिणाम होऊ नये, म्हणून योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय कोणता असेल आम्ही या लेखात तुम्हाला सांगणार आहोत.

SBI म्युच्युअल फंड :
वाढत्या महागाईचा तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम होऊ नये, म्हणून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय कोणता असेल हे तुम्हाला माहीत नसेल तर, आम्ही तुम्हाला या लेखात म्युच्युअल फंड एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)ची माहिती देणार आहोत. SIP हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय असू शकतो. गुंतवणूक आणि बाजार तज्ञांच्या मते, जर आपण SIP मध्ये मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर मुद्दल गमावण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते. पण गुंतवणुकीचे पर्याय तुम्ही कसे निवडता हे खूप महत्त्वाचे आहे.

जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंडांबद्दल माहिती घेतली तर एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड, एसबीआय फोकस्ड इक्विटी आणि एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड या अश्या योजना आहेत ज्यांनी मागील 5 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. ह्या योजनेची एक चांगली गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी या म्युचुअल फंड योजनेत एकरकमी आणि SIP दोन्ही पद्धतीनं गुंतवणूक केली त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे.

सर्वात जास्त परतावा देणाऱ्या म्युचुअल फंडबद्दल जाणून घेऊ :

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
व्हॅल्यू रिसर्च डेटानुसार, जर तुम्ही या फंड योजनेत 1 लाख रुपये एकरकमी गुंतवले असते तर 5 वर्षांत तुम्हाला 3.26 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, जर तुम्ही SIP मध्ये महिन्याला 10 हजार रुपये गुंतवणूक केली असती, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 14.51 लाख रुपये परतावा मिळाला असता.

एसबीआय फोकस्ड इक्विटी:
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना छप्पर फाड परतावा मिळाला आहे. व्हॅल्यू रिसर्च डेटानुसार, जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आता 2.19 लाख परतावा मिळाला असता. त्याच वेळी, जर तुम्ही 10 हजार रुपये मासिक एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरुवात केली असती तर आता तुम्हाला त्यावर 10.23 लाख रुपये परतावा मिळाला असता.

एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड :
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मागील पाच वर्षांत जबरदस्त परतावा मिळाला आहे. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या योजनेत 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीची सुरुवात केली असती, तर तुम्हाला त्यावर आता 9.68 लाख रुपये परतावा मिळाला असता. त्याच वेळी, एक लाख रुपये एकरकमी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला 1.93 लाख रुपये परतावा मिळाला असता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Funds for long term investment for huge return on 11 August 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x