 
						SIP Calculator | आचार्य चाणक्य म्हणाले की, व्यक्तीने तिजोरीत पैसे ठेवू नयेत, तर त्याची गुंतवणूक करावी कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते आणि तिजोरीत ठेवल्याने पैसा हळूहळू नाहीसा होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, तुम्ही तुमच्या पैशातून जी काही रक्कम वाचवता ती घरात न ठेवता कुठेतरी गुंतवा. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसेल तर तुम्ही थोड्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला १० रुपयांची रक्कम गुंतवल्यास लाखो रुपयांची भर पडू शकते. जाणून घ्या इथे कसं?
लखपती बनवू शकतो म्युच्युअल फंड
गुंतवणुकीच्या दृष्टीनेही आजकाल म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. बाजाराशी जोडलेला असूनही जोखीम कमी मानली जाते. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही केवळ ५०० रुपयांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला मुद्दलासोबत कंपाउंडिंग म्हणजे व्याजावरील व्याजाचा लाभ मिळतो. सर्वसाधारणपणे त्यावर १२ टक्के तर कधी १५ ते २० टक्के व्याज मिळू शकते. त्यात चांगला नफा मिळवण्यासाठी दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते. जर तुम्ही यात 15 ते 20 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्ही अगदी कमी रकमेच्या गुंतवणुकीतून मोठा नफा कमावू शकता आणि करोडपती बनू शकता.
1000 रुपयांपासून 10 लाखांचा निधी कसा तयार करावा
जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर तुम्ही वार्षिक 12 हजार रुपयांची गुंतवणूक कराल. सलग 20 वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुम्ही एकूण 2,40,000 रुपयांची गुंतवणूक कराल, पण 12 टक्के व्याजावर तुम्हाला 7,59,148 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे 20 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 9,99,148 रुपये म्हणजेच जवळपास 10 लाख रुपये मिळतील.
तर जर तुम्हाला 14 टक्के दराने नफा झाला तर मॅच्युरिटी ची रक्कम 13,16,346 रुपये होईल आणि जर तुम्हाला 15 टक्के दराने परतावा मिळाला तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 15,15,955 रुपये मिळतील. म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही मासिक 1000 रुपयांची गुंतवणूक करून केवळ 20 वर्षात कमीत कमी 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांची भर घालू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		