30 April 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

Stock in Focus | 123 टक्के परतावा प्लस हा शेअर वारंवार अप्पर सर्किटमध्ये, हा स्टॉक घेण्यासाठी धावपळ का?

Stock In Focus

Stock in Focus| पंचशील ऑरगॅनिक ही फार्मा क्षेत्रातील कंपनी आज शेअर बाजारात एक्स- डिव्हिडंड डेटवर ट्रेडिंग करणार आहे. सुरुवातीच्या ओपनिंग मध्येच या कंपनीचा शेअर अप्पर सर्कीटवर जाणून बसला. या आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर पंचशील ऑरगॅनिक कंपनीचे शेअर्स 299.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पण काही वेळातच हा स्टॉक 5 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह 307 रुपये किंमत पातळीवर पोहचला होता. या कंपनीची अप्पर सर्किट विंडो 5 टक्के पर्यंतच आहे.

लाभांशची रेकॉर्ड तारीख :
पंचशील कंपनीने नुकताच आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 0.80 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबिला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, ” पंचशील कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर 0.80 रुपये म्हणजेच 8 टक्के लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संचालक मंडळाने लाभांश वाटप करण्यासाठी 5 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. कंपनीने यापूर्वी 22 सप्टेंबर 2022 रोजी एक्स-डिव्हिडंड डेट वर ट्रेडिंग केली होती. त्यावेळी कंपनीच्या वतीने आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1 रुपये लाभांश वितरीत करण्यात आला होता. पंचशील कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवसांपासून अप्पर सर्किट लागत आहे.

सलग तीन दिवस अपर सर्किट :
गेल्या आठवड्यात 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर रोजी हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागून 16.93 टक्क्यांची वाढ झालेली आपण पाहू शकतो. ज्या लोकांनी एक महिनाभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यानी या तेजीचा जास्त फायदा झालेला नाही, सतत अप्पर सर्किट असूनही त्या लोकांचे गुंतवणूक मूल्य 3.73 टक्के घटले आहे. मागील 6 महिन्यांचे कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीच्या शेअरच्या किमतीत 48.42 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी या चालू वर्षात पंचशील फार्मा कंपनीचे शेअर 123.35 टक्क्यानी वधारले आहेत. पंचशील कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 425.55 रुपये आहे, तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 97.95 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Panchsheel Organics Stock In Focus of Stock market traders after hitting Upper Circuit for Continuous three day on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x