 
						Smart Investment | प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि स्वतःच्या उज्वल भवितव्यासाठी करोडपती बनण्याची स्वप्न पाहतो. अनेकांना वाटतं की करोडपती बनण्यासाठी आयुष्याचे अनेक वर्ष मेहनत करावी लागते. ही गोष्ट खरी जरी असली तरी सुद्धा खास गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही एक जबरदस्त फॉर्म्युला घेऊन आलो आहोत. या इन्व्हेस्टमेंट टीपमुळे तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. चला तर पाहूया नेमकी काय आहे ही इन्वेस्टमेंट टीप
काय आहे हा करोडपती बनण्याचा फॉर्म्युला :
20X12X20 हा एक श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे. केवळ या एका फॉर्म्युल्यामुळे तुम्हाला 2 कोटींचे मालक अगदी सहजरीत्या बनता येणार आहे. यामधील 20 चा अर्थ प्रत्येक महिन्याची 20000 रुपयांची गुंतवणूक असा होतो. त्यानंतर 12 म्हणजे 12% ने मिळणारा परतावा आणि शेवटचे 20 म्हणजे तुम्हाला पुढील 20 वर्ष लगातार गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. तर फॉर्मुल्याची फोड आपण व्यवस्थित जाणून घेतली आहे. आता फॉर्मुला कशा पद्धतीने वापरायचा तेही पाहू.
मिळणार 12% परतावा :
SIP तसेच म्युच्युअल फंड या योजनांमध्ये गेल्या वर्षीपासून मोठ्या संख्येने गुंतवणुकीचा आकडा वाढला आहे. या योजना मार्केट लिंक्ड असून सुद्धा सरासरी परतावा 12%ने देतात. त्याचबरोबर कंपाऊंडिंगच्या मदतीने देखील तुम्ही भरपूर मोठा फंड तयार करू शकता.
अशा पद्धतीने व्हाल 2 कोटींचे मालक :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 20000 हजार रुपये 20 वर्षांसाठी गुंतवले असता एकूण रक्कम 48,00,000 लाख रुपये जमा होतील. या रक्कमेवर 12% ने तुम्हाला 1,51,82,958 ही रक्कम केवळ व्याजाची असेल. पुढील २० वर्षांनंतर तुम्हाला व्याजासकट 1,99,82,958 म्हणजेच एकूण 5 करोडो रुपयांचा फंड मिळेल. त्याचबरोबर तुम्ही हा फंड आणखीन 1 वर्ष सुरू ठेवला तर, तुम्ही शंभर टक्के 2,27,73,484 कोटींचे मालक बनाल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		