15 December 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; एसीबी'कडून न्यायालयात शपथपत्र दाखल

Irrigation Scam, Former Deputy CM Ajit Pawar

नागपूर: महाविकास आघाडी सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जबाबदारी ठरविण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अ‍ॅन्ड इन्स्ट्रक्शनचा आधार घेतला आहे. (Former Deputy Chief Minister Ajit Pawar gets Clean Chit from ACB in Irrigation Scam)

महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस अ‍ॅन्ड इन्स्ट्रक्शनमधील नियम १४ अनुसार (Maharashtra Government Rules of Business And Instruction Law) विभागाच्या सचिवाने टेंडरसंबंधित बाबी तपासून माहिती संबंधित मंत्री व मुख्य सचिवांना दिली पाहिजे. जल संसाधन विभागाचे सचिव व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांचा दर्जा, कर्तव्ये व जबाबदाऱ्या समान आहेत. त्यामुळे सिंचन प्रकल्पांचे टेंडर व खर्च मंजुरीमध्ये काही अवैधता आहे वा नाही, हे तपासण्याची जबाबदारी या दोन अधिकाऱ्यांची होती. त्यांनी याची माहिती पवार यांना द्यायला हवी होती. त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे पवार यांच्यावर घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करता येणार नाही, असे आताच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

१९९९ ते २००९ या कालखंडात राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची अनियमितता असल्याची बाब समोर आली. फेब्रुवारी २०१२ मध्ये तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करून सिंचन विभागात गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले होते. त्यानंतर २०१२ मध्ये जनमंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करून राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, सीबीआय चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू होती.

सर्वाधिक खळबळजनक म्हणजे मुख्य अभियंता पांढरे (Chief Engineer Pandhare) यांच्या गौप्यस्फोटाने तर जलसिंचन प्रकल्पांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या दहा वर्षात उभारण्यात आलेले प्रकल्प अतिशय निकृष्ट दर्जाच्या साधनसामुग्रीचे आहेत. सरकारने राज्यातील अशा सर्व प्रकल्पांवर तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा खर्च केला आहे. सिंचन मात्र फक्त एकच टक्का झालं आहे. याप्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चौकशीसाठी ऑक्टोबर २०१५ मध्ये ३ वेळा समन्स बजावला होता. यानंतर त्यांची एसीबीच्या मुख्यालयात सहा तास चौकशी झाली होती. परंतु, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना क्लीन चिट दिली होती.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x