19 August 2019 3:32 AM
अँप डाउनलोड

देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी

Unknown letter with threatening message to blast nashik devlali railway station

नाशिक : देशभरात पुलवामा हल्ल्यामुळे भीतीचं आणि संतापाचं वातावरण असताना काल रविवारी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाले आहेत.

दरम्यान, बॉम्ब शोधक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला. याठिकाणी एक बेवारस बॅग सापडली, परंतु या बॅगेत बॉम्ब असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र तपासानंतर या बॅगेत बॉम्ब नसून काही कागदपत्रे, कपडे आणि खाण्याच्या वस्तू आढळल्या परंतु काही संशयास्पद आढळले नाही. मात्र परिसरात भीतीदायक वातावरण कायम आहे.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Indian Army(34)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या