15 December 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

ज्यांची स्वतःच्या घरातही निष्ठा नाही अशा लोकांबद्दल आणि त्या घाणीत मला पडायचं नाही, आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दात लायकी दाखवली

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

आदित्य ठाकरे यांनी दिलं असं प्रतिउत्तर :
राहुल शेवाळे यांच्या या आरोपांना आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. नागपूरमध्ये बोलताना ते म्हणाले, मी एवढचं सांगेन की, Love You More. मुख्यमंत्र्यांवरुन वाचविण्याचा, राज्यपालांना वाचविण्याचा हा प्रयत्न असावा. ज्यांची निष्ठा घरात नसते, त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. मी या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही.

आता त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं हे मला माहित आहे. पण मला यात जायचं नाही. काय काय लोकांच्या खाजगी आयुष्यात मला डोकावायचं नाही. ते माझ्यावर संस्कार नाहीत, मला या घाणीत जायचं नाही. आता वर्ल्डकप बघितला असेल. आपण गोल मारतं राहू. ते सेल्फ गोल मारतायतं. त्यांचे अनेक व्हिडीओज आहेत. पण मी कुठेही यांच्यावर घाणेरेडं बोलणार नाही, असं ते म्हणाले.

सुनील प्रभू यांचाही हल्लाबोल :
सुनील प्रभू यांनी राहुल शेवाळे यांच्यावर पटलवार केलाय. राहुल शेवाळे यांचं डोकं फिरलंय, असं प्रभू यांनी म्हटलं. राहुल शेवाळे यांनी एयू म्हणजे आदित्य उद्धव का असा सवाल लोकसभेमध्ये आज उपस्थित केला. सुनील प्रभू यांनी असं प्रत्युत्तर दिलं. पुढे सुनील प्रभू म्हणाले, राहुल शेवाळे यांचं डोकं फिरलंय. शिवसेना पक्षाला राहुल शेवाळे यांना मोठं केलं. त्या राहुल शेवाळे यांची जीभ टीका करताना चालली कशी. हा खरा प्रश्न आहे. राहुल शेवाळे हे मिंध्ये गटात जाऊन भाजपच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. त्यामुळं त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय, असा आरोपही त्यांनी केला.

महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप
काही महिन्यांपूर्वी एका महिलेने खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. या महिलेने साकीनाका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी राहुल शेवाळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. या महिलेने केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा डागाळण्यासाठी आणि खंडणी वसुलीसाठी हे आरोप करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला होता.

त्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. त्यानंतर कोर्टाने सुनावणी करत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, त्यांचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते आणि त्याचाच धागा पकडून आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दात उत्तर दिलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bollywood Actor Sushantsingh Rajput Case Aaditya Thackeray replay to Shinde Camp MP Rahul Shevale check details on 21 December 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x