22 January 2022 4:15 AM
अँप डाउनलोड

नाशिकमध्ये येणारा KIA मोटर्स प्रकल्प नाशिकच्या दत्तक बापाने नागपूरला पळवून नेला - मनसेचा आरोप

bjp maharashtra, devendra fadnavis, devendra fadnavis, raj thackeray, mns, Nitin Bhosale, Maharashtra CM devendra fadnavis, KIA motors

आज राज ठाकरेंची नाशिकमध्ये सभा आहे, याच पार्श्वभूमीवर जनतेला संबोधित करत असताना मनसेचे नाशिकचे उमेदवार “नितीन भोसले” यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिकचा दत्तक बाप देवेंद्र फडणवीसांनी मागच्या ५ वर्षात नाशिकसाठी काहीच केलं नाही असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

ऑस्ट्रेलियन कार मेकर “KIA” मोटर्स कंपनी आपला प्रकल्प नाशिकमध्ये सुरु करणार होती परंतु नाशिकचे दत्तक बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नागपूरला पळवून नेला असा गंभीर आरोप नाशिकचे मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या वाटेचं पाणी हे नालायक सरकार गुजरातला देत आहे असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेले शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील नाशिकचे दत्तक बाप देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यामते जे काम राज ठाकरेंच्या मनसेने मागच्या ५ वर्षात केलं ते काम आधी कोणीही केलं नव्हतं आणि यापुढे देखील कोणी करतील यात शंका आहे. तसेच नाशिकच्या दत्तक बापाने नाशिकचा विकास तर केला नाहीच आणि पुढे करतील याची हि शाश्वती नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

जे आरोप मनसेच्या नितीन भोसलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत तेच आरोप या आगोदर देखील विरोधकांनी केले होते. मुख्यमंत्र्यांनी बरेच चांगले प्रोजेक्ट्स परस्पर नागपूरला देऊन महाराष्ट्राच्या इतर भागांवर अन्याय केला आहे असा आरोप त्यांच्यावर बऱ्याच वेळा झाला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x