23 November 2019 8:05 AM
अँप डाउनलोड

नाशिक: वसंत गीते भाजपातही नाराज; समर्थकांची बैठक बोलावली

Nashik Vidhansabha Election 2019, Devayani Farande, Vasant Gite

नाशिक: विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केल्यानंतर पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला सुरुवात केली आहे. युतीतील बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

नाशिकमधील दोन माजी आमदार आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये वसंत गीते आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील शिवसेनेचे ताकदवान नेते संतोष शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, वसंत गीते यांचे आमदार देवयानी फरांदे यांचे नाशिकमधील वैर सर्वश्रुत आहे.

२०१४ मधील निवडणुकीत आयत्यावेळी अशीच मनसेची गोची करत समर्थकांची बैठक बोलावून अचानक पक्षाला दगा दिला होता. त्यावेळी मूळ कारण भाजपाची देशभर झालेली हवा हे कारण होतं. त्यानुसार त्यांनी मनसे सोडत भाजपमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केला. मात्र मुलाला मिळालेलं उपमहापौर पद सोडल्यास त्यांच्या वाट्याला फारस काही आलं नाही. मात्र ५ वर्षांनंतर त्यांना काहीच हाती लागलं नसून, भाजपने त्यांना आश्वासनं देत खिळवून ठेवत आयत्यावेळी दगा दिल्याने ते भाजपाला राम राम करण्याच्या तयारीत असल्याने तडकाफडकी समर्थकांची बैठक बोलावली आहे. कुठेच उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(351)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या