2 May 2025 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

आता मी ठाण्यात यतोय, तुम्ही ठाण्यात सभा लावा, उद्धव ठाकरे ठाण्यात गरजणार आणि धर्मवीरांच्या ठाणेकरांना साद घालणार

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | संजय राठोड आमदार असलेल्या दिग्रस मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचं स्वागत केलं. यावेळी संजय देशमुख यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. तसेच आईसोबत झालेला संवादालाही उजाळा दिला. शिवसेना भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.

बंडखोरी केलेल्या आमदारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘काहीजण म्हणतात तुम्ही विनंती का केली नाही त्यांना. का करू विनंती? तुम्ही आम्हाला संपवायला निघाला. तुम्ही आडवे गेला नसता तर दसरा मेळावा सोपा झाला असता. आपण जिंकलेली जागा भाजपच्या पारड्यात टाकली. शिवसेनेचं चिन्ह गोठवलं. मला कोणी संपवण्याची भाषा करणार असेल तर मी अजून चिडून कामाला लागतो, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

ठाण्यात सभा लावा :
ज्या ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले तेव्हा शिवसेना दहापट मोठी होते, असा दावा त्यांनी यावेळी केला. मी पोहरा देवीला मेळावा घ्यायचं जाहीर केलं आहे. आता मी ठाण्यात पण घेईल. हा आवाज बुलंद होत आहे. तुम्ही ठाण्यात सभा लावा, मी आलोच म्हणून समजा. कोणतंही शहर लोकप्रतिनिधींच्या शिवाय राहाणं योग्य नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘कोणी विनंती करतंय काय हे बघत होते. मग कोणाला तरी उभा करून विनंती करवून घेतली. म्हणजे विनंती करण्यासाठी विनंती केली गेली. तोंडावर आपटण्यापेक्षा पळालेले बरं, असं त्यांना वाटलं. मग माझं नाव आणि चिन्ह गोठवण्याची घाई का केली?’ असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uddhav Thackeray reaction after Sanjay Deshmukh join Thackeray camp check details 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Uddhav Thackeray(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या