2 May 2025 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

...तर बाळासाहेबांनी जन्माला आल्या आल्याच उद्धव ठाकरेंचा गळा दाबला असता, कृपाशंकर सिंह बरळले

BJP Maharashtra

BJP Leader Krupashankar Singh | मुंबईच्या रस्त्यावर आज लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडीचा अभुतपूर्व असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रमुख नेते सामील झाले होते. या मोर्चाच्या समारोपाच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा सामील झाले आहे.

भाजप नेत्यांकडून महापुरूषांबद्दल करण्यात आलेली विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यासह विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीचा महामोर्चा तुफान अशा गर्दीत निघाला. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच प्रमुख नेते मोर्चात सामील झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सामील होणार की नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता शरद पवार थेट व्यासपीठावर हजर झाले. शरद पवार कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली.

दुसरीकडे, मुंबईतील विलेपार्ले परिसरातही असंच एक निषेध आंदोलन पार पडलं. या आंदोलनात भाजपचे स्थानिक आमदार पराग अळवाणी, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाविकास आघाडी आणि नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मात्र कृपाशंकर सिंह यांची जीभ घसरली.

काय म्हणाले कृपाशंकर सिंह?
काँग्रेस नेत्यांचा समाचार घेताना कृपाशंकर सिंह म्हणाले, ज्या शिवसेनेसोबत तुम्ही मोर्चा काढत आहात, त्या शिवसेनेने काँग्रेसबद्दल, तुमच्या नेत्या सोनिया गांधींबद्दल काय बोलले ते आठवाव, आठवत नसेल तर ‘चुल्लू भर पाणी में डूब मरो’. तर, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना कृपाशंकर सिंह म्हणाले, माझा नालायक मुलगा हिंदुविरोधी शक्तींसोबत जाणार आहे हे जर बाळासाहेबांना त्यावेळी कळलं असतं तर त्यांनी जन्माला आल्या आल्याच उद्धव ठाकरेंचा गळा दाबला असता. सिंह यांच्या विधानानंतर आता शिवसैनिक त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Kripashankar Singh controversial statement on Uddhav Thackeray check details on 17 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJP Maharashtra(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या