4 October 2023 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अवघ्या एका महिन्यात 150 टक्के पर्यंत परतावा देत आहेत, फायदा घेणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 04 ऑक्टोबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट, इंडेक्स नंबर घसरल्याने आता DA किती वाढणार? Stocks in Focus | एका आठवड्यात 53 टक्के पर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट पैसे गुणाकारात वाढवतील BOI Net Banking | सरकारी बँक ऑफ इंडियाच्या FD योजनेवरील व्याजदरात वाढ, गुंतवणूकदारांना मिळणार इतकं अधिक व्याज
x

... आणि अजितदादा फडणवीसांना म्हणाले, 'मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री!

Ajit Pawar

Ajit Pawar | देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेचार वर्षे मुख्यमंत्री राहायचे आणि नंतरच्या सहा महिन्यात वेगळा विदर्भ करायचा असं त्यांच्या मनात होतं आता ते कितीही नाही म्हंटले तरी त्यांच्या मनात होतं असे पटवून देत असतांना अजित पवार यांनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रातील मंत्री पदावरून शिंदे-फडवणीस सरकारवर हल्लाबोल करत असतांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आणि सहा खात्यांची जबाबदारी आहे त्यावरून देखील टोला लगावला आहे.

मी आता येऊन वहिनींनाच सांगणार
‘देवेंद्रजींकडे 6 खाती आहेत ना, अजून तुमच्या खात्यांचा भार त्यांच्या खांद्यावर कशाला टाकता? 6 पालकमंत्री पदं त्यांच्याकडे आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण त्यांनी 6 पालकमंत्री वेगळे नेमले तर काम जास्त होणार नाही? भाजपलाही महिलांची मतं मिळाली. 6 महिन्यात अजून एक महिला सापडेना मंत्री करायला? हा कुठला कारभार आहे? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघा यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं तर लगेच एखादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे’, असा टोला अजित पवारांनी हाणला.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘देवेंद्रजींना काही विचारलं तर मुख्यमंत्र्यांची संमती आणा म्हणतात, मुख्यमंत्र्यांना विचारलं तर म्हणतात देवेंद्रनी सांगितलं की मी केलं, नुसती टोलवाटोलवी सुरू आहे. दादांची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती तर अशी टोलवाटोलवी झाली नसती. आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ, पण त्यांना एक-दोन साधे डिपार्टमेंट दिले आहेत आणि बाजूला ठेवलं आहे आणि स्वत: सहा-सहा महत्त्वाची डिपार्टमेंट घेतली आहेत. या पद्धतीचं राजकारण करता बरोबर नाही. तुम्हाला या लोकांचा तळतळाट लागेल’, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Opposition Leader Ajit Pawar statement in assembly house over Devendra Fadnavis check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x