30 April 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट
x

Health First | चहासोबत चुकूनही या गोष्टी खाऊ नका | होईल आरोग्याला नुकसान

Tea Habit

मुंबई, ०७ जून | प्रत्येक घरात चहाला महत्त्व दिले जाते आणि दररोज घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पण काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छाही असते. जसे, रिकाम्या पोटी नुसता चहा प्यायल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते, तसेच आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. चला तर अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया, ज्याचे चहासोबत सेवन केल्याने शरीराला हानी होऊ शकते.

चहा पिण्याची आवड अनेकांमध्ये दिसून येते. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप प्रथम हातात लागतो. तर बऱ्याच जणांना चहासोबत काही ना काही खाणंही आवडतं. तुम्हाला देखील चहासोबत काही पदार्थ खाण्याची आवड असेल. मात्र तुम्ही चहासोबत जे खाताय त्यामुळे आरोग्याला नुकसान तर होत नाहीये ना? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चहासोबत कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये.

बेसनाचे पदार्थ:
बेसनचा लाडू किंवा बेसनचे काही पदार्थ आपण चहासोबत खाणं पसंत करतो. मात्र ही हेल्दी सवय नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहासोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्त्व कमी होतात. शिवाय यामुळे पचनासंर्भातील समस्याही उद्भवतात.

कच्चे खाद्यपदार्थांचं सेवन टाळावं:
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहासोबत कच्चे पदार्थ खाणं योग्य नाही. यामुळे पोटाच्या समस्या बळावून आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो चहासोबत सॅलड, मोड आलेले कडधान्य, किंवा उकडलेलं अंड खावं.

चहा प्यायल्यावर पाणी पिणं टाळा:
चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर थंड पदार्थांचं सेवन करणं टाळावं. त्याचप्रमाणे चहा प्यायल्यानंतर त्वरित पाणी प्यायल्याने पचन क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे हायपर अॅसिडीटी होऊन पोटाची संबंधित समस्या जडू शकतात. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावं.

लिंबाचा वापर नको:
अनेकजण चहामध्ये लिंबू पिळून चहा बनवतात. मात्र हा चहा अॅसिडीटी आणि पचन संबंधी तसंच गॅस संबंधी तक्रारी उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. यासाठी डॉक्टरही चहासोबत लिंबाचे पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला देतात.

हळदीचे पदार्थ खाऊ नयेत:
चहासोबत किंवा चहा पिऊन झाल्यानंतर हळद घातलेले खाद्यपदार्ख खाणं टाळावं. चहा आणि हळदीमध्ये उपस्थित रासायनिक घटक एकमेकांशी क्रिया करून पचन कार्याला नुकसान करू शकतात. त्यामुळे हळद असलेल्या पदार्थांचं सेवन टाळावं.

चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. आपल्या घरातील वडीलधारी मंडळीही आपल्याला असे करण्यास प्रतिबंध करतात. कारण चहा पिल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या उद्भवतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.

 

News English Summary: Tea is valued in every home and is one of the most important home-made items. But some people also want to eat something with tea. Just as drinking tea on an empty stomach can harm the body, the wrong foods you eat with tea can also harm the body. Let’s learn about the substances that can harm the body if consumed with tea.

News English Title: Avoid eating these things with tea health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x