23 April 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

राज ठाकरेंच्या वांद्रे शासकीय वसाहतीतील सभेनंतर शिवसेनेला ३ महिन्यांनी जाग, सभा आयोजित?

मुंबई : मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.

मुंबईमधील मराठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचं अधोरेखित करत, सरकार येथील जमिनी इंच इंच विकू याच उद्देशाने धोरण राबवत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईमधील वांद्रा येथील शासकीय वसाहतीला भेट देऊन त्यांनी इथल्या समस्या समजून घेतल्या होत्या तसेच नंतर स्थानिकांना संबोधित सुद्धा केलं होत.

पुनर्विकासाच्या नावाने वांद्रा येथील शासकीय वसाहतीमधील लोकांना विस्थापित करण्याचा घाट घातला जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सरकारच्या एकूणच हालचाली या मुंबईमधून मराठी माणसाचं अस्तित्वच संपविण्यासाठी आहेत असा थेट आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. पुनर्विकासाच्या नावाखाली इथल्या स्थानिक लोकांना घरं खाली करायला सांगितली जात आहेत. परंतु इथल्या नागरिकांचा त्याला ठाम विरोध आहे. त्याच लोकांना धीर देण्यासाठी आणि आश्वस्त करण्यासाठी राज ठाकरे यांनी या वसाहतीला भेट देऊन तिथल्या रहिवाशांना संबोधित केलं होत.

इथल्या स्थानिक मराठी माणसाला बाहेर हुसकावून नंतर तिथे परप्रांतियांना वसवण्याचा शिष्ठबद्ध प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी लोकांना सूचित केलं आहे. कोणतीही सरकार आलं तरी सामान्य मराठी माणसाच्या संबंधित धोरणात काही बदल होत नाहीत असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते. परंतु वांद्रे शासकीय वसाहतीतील लोकांना वचन देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुम्ही व तुमच्या पुढच्या पिढ्या वांद्रयातच राहणार हा माझा शब्द आहे’ त्यामुळे स्थानिकांमध्ये एक आशा जागी झाल्याच चित्र पाहायला मिळालं होत.

परंतु, राज ठाकरेंच्या त्या भेटीनंतर आता निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ३ महिन्यांनी शिवसेनेला जाग आली असून आगामी निवडणुकीत इथल्या मत पेटीतून शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना फटका बसू नये म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची वांद्रा शासकीय वसाहतीत सभा आयोजित केली जाणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे युतीच्या राजवटीतच इथल्या स्थानिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वांद्रा सरकारी वसाहतीत केवळ पोश्टरबाजी करणारे भाजप आणि शिवसेना पक्ष मात्र निवडणुकीच्या तोंडावर आणि राज ठाकरेंच्या सभेनंतर वांद्रा सरकारी वसाहतीतील रहिवाश्यांसाठी स्वतःच्याच सत्ताकाळात भावनिक हंबरडा फोडून मतांचा जोगवा मागण्यास सज्ज होण्याच्या तयारीला लागले आहेत, अशी कुजबुज वांद्रे सरकारी वसाहतीत सुरु आहे.

दरम्यान, निवडणुका लागल्या की मराठीचा कैवार घेणारी शिवसेना सत्ताकाळ सुरु झाल्यावर, मागील काही दिवस मुंबईत ‘उत्तर भारतीय संमेलन’ आयोजित करून थेट “उत्तर भारतीयो के सन्मान मे शिवसेना मैदान मे” असे नारे देत सुटली होती. परंतु मुंबईत पुन्हा मराठीचा एल्गार सुरु झाल्याने निवडणुका जवळ आल्या आहेत असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x