नवी दिल्ली : सध्या देशभर #MeToo मोहीम जोर धरत असताना भाजपचे खासदार उदित राज यांनी आज ट्विट करून #MeToo मोहीम थांबवा असे अप्रत्यक्ष म्हटले आहे. समाज माध्यमांद्वारे जोर धरणाऱ्या या मोहिमेवर खासदार उदित राज यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत.
भाजपाचे खासदार उदित राज यांनी आज ट्विट करून #MeToo मोहीम थांबवा असे म्हटले आहे. उदित राज ट्विटमध्ये म्हणतात, #MeToo जरुरी आहे, परंतु तब्बल १० वर्षांनंतर असे आरोप करण्यात काय अर्थ आहे? इतक्या वर्षांनी त्याची सत्यता कशी पडताळणार? आणि ज्याच्यावर खोटे आरोप होतील, त्याच्या आयुष्यावर किती परिणाम होईल? याचा विचार करायला हवा. परंतु जे सुरु आहे ते थांबवणे गरजेचे आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं आहे.
#MeToकैम्पेन जरूरी है लेकिन किसी व्यक्ति पर 10 साल बाद यौन शोषण का आरोप लगाने का क्या मतलब है ? इतने सालों बाद ऐसे मामले की सत्यता की जाँच कैसे हो सकेगा?जिस व्यक्ति पर झूठा आरोप लगा दिया जाएगा उसकी छवि का कितना बड़ा नुकशान होगा ये सोचने वाली बात है।गलत प्रथा की शुरुआत है।#MeToo
— Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) October 9, 2018
यह कैसे संभव है कि कोई “लिव इन रिलेशन” में रहने वाली लड़की अपने पार्टनर पर कभी भी ‘रेप’ का आरोप लगाकर उस व्यक्ति पर मुकदमा दर्ज करा दे, वो व्यक्ति जेल चला जाए। इस तरह की घटना आये दिन किसी न किसी के साथ हो रहा है। क्या ये अब ब्लैकमेलिंग के लिए नही इस्तेमाल हो रहा है ?#MeToo
— Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) October 9, 2018
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		