28 June 2022 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
x

भर दिवाळीत भाजपवर 'राज'कीय फटाके, भाजप IT सेल चवताळण्याची शक्यता

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केलं असून त्यांना नरकासुर असं म्हटलं आहे. व्यंगचित्रात अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रात अमित शहा यांना नरकासुराच्या स्वरुपात दाखवलं आहे. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तोच दिवस नरक चतुर्दशी म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. त्यात आज नरक चतुर्दशी… या दिवसाची सुरुवात आंघोळ केल्यानंतर कारेटं पायाखाली एका फोडले जाते. त्याच कारेटे म्हणून अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. त्यात भाजपा पार्टी झोपलेली असून, अमित शहारुपी नरकासुराला चिरडण्याचे स्वप्न पाहत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, भर दिवाळीत राज ठाकरेंच्या या ‘राज’कीय फटाक्यांवरून भाजपचा आयटी सेल चवताळून उठण्याची शक्यता आहे. अमित शहा यांना स्वतः भाजपाच चिरडण्याची स्वप्नं पाहत असल्याचे दाखविण्यात आल्याने हे व्यंगचित्र दिल्लीश्वरांच्या जिव्हारी लागल्यास नवल वाटायला नको.

नेमकं काय आहे ते व्यंगचित्र?

 

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)#Raj Thackeary(714)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x