1 May 2025 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती - आ. श्रीमंत पाटील

MLA Shrimant Patil

बंगळुरू, १३ सप्टेंबर | कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सांगितलं. मात्र “मी भारतीय जनता पक्षाची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. परंतु, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही,” असंही पाटील म्हणाले.

मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती – BJP was offered me money to join BJP in 2019 said Former Minister Shrimant Patil :

मी मला दिलेली पैशांची ऑफर न घेता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मला प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले गेले होते. त्यावेळी मला पाहिजे तेवढे पैसे मागता आले असते. मात्र, मी पैशांची मागणी केली नाही. मी लोकांची सेवा करण्यासाठी मंत्रीपदाची मागणी केली होती,” असंही पाटील यांनी म्हटलंय. “मला माहित नाही की मला सध्याच्या सरकारमध्ये मंत्रीपद का दिले गेले नाही. पण पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद देण्यात येईल, असं आश्वासन मला देण्यात आलंय. यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझं बोलणं झालंय,” असंही पाटील यांनी सांगितलं.

सध्याच्या कॅबिनेटबद्दल आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मला कॅबिनेटमध्ये का घेतलं नाही हे सांगता येत नाही. परंतु कॅबिनेट विस्तारावेळी मला सहभागी करुन घेतलं जाईल असं पक्षाने म्हटलं आहे. भाजपा नेतृत्वाने कॅबिनेट खात्यांना घेऊन माझ्याशी चर्चा केली. जसं कॅबिनेटचा विस्तार होईल त्यात मला संधी मिळेल असा दावा त्यांनी केला. मराठा समुदायाला मी मंत्री व्हावं अशी इच्छा आहे त्यामुळे मला कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP was offered me money to join BJP in 2019 said Former Minister Shrimant Patil.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या