12 December 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न : एक मोठी ऑफर

नवी दिल्ली : भारताच्या राजकारणात तसेच संसदेतील मानाचं असलेलं पद म्हणजे राज्यसभेचे उपसभापती पद जे भाजपश्रेष्ठी शिवसेनेला देण्यास तयार असून तसा निरोप पक्ष श्रेष्ठींकडे गेला असून भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाल्याचे समजते.

शिवसेनेने आधीच स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी भाजपकडून पुन्हां शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्नं सुरु झाले आहेत. गेल्या ४ वर्षात युतीमध्ये बराच दुरावा आला असून सत्तेत राहून भाजपला डिवचण्याचा एकही संधी शिवसेना गमावत नाही. युतीत तोच आलेला दुरावा दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्नं सुरु झाल्याचे समजते.

गेली चार दशक काँग्रेसकडे असलेलं राज्यसभा उपसभापती पद हे शिवसेनेला देण्याच्या हालचाली भाजपच्या वरिष्ठांकडून सुरु असून, तसा प्रस्ताव शिवसनेंकडे पाठविण्यात आला आहे. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी जे कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे. त्यामुळे ते पॅड शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव मातोश्रीवर धाडण्यात आला आहे. परंतु तो स्वीकारायचा किंव्हा नाही ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील असे समजते. जर शिवसेनेने तो स्वीकारलाच तर ते पद अनुभवाच्या तत्वावर संजय राऊत यांच्याकडे जाऊ शकत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x