13 May 2021 9:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
पेट्रोल दरवाढ | जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही ते तरी काढून घेऊ नका - शिवसेना राज्याला अधिक लस किंवा इतर कोरोनासंबंधित साहित्य द्या असे एक तरी निवेदन फडणवीसांनी मोदींकडे दिले का? - बच्चू कडू भाजपाची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनाची उच्च न्यायालयाकडून पोलखोल Health First | झोपेत असताना घोरत असाल तर हे करा त्यावर उपचार योगी सरकारच्या कृपेने युपीतील कोरोना रुग्ण आत्मनिर्भर | इस्पितळात घरूनच खाटा आणण्याची वेळ Health First | ब्रोकोली ही भाजी आहे आरोग्यास लाभदायक विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न
x

पवार कुटुंबानं स्वप्नातलं सत्यात उतरवलं | म्हणून तर १०५ आमदार असून घरी बसावं लागलं

NCP leader Rupali Chakankar, BJP state president Chandrakant Patil

पुणे, २९ नोव्हेंबर: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का? अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “‘स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानं उतरवलं आहे. तसं नसतं तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावं लागलं नसतं,’ असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोना लसीची माहिती घेण्यासाठी पुण्यातील सुप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन संपूर्ण आढावा घेतला होता. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या वेळीच त्यांचा हा दौरा होता. नेमका तोच धागा पकडून, पंतप्रधान हे महाराष्ट्र सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मिश्कीलपणे म्हणाल्या होत्या. त्यावर सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

त्यानंतर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी समाज माध्यमातून प्रतिउत्तर दिलं आहे. ‘सुप्रिया ताई स्वप्नात आहेत का असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांतदादांनी म्हटलंय. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबाने उतरवलं आहे. नाहीतर १०५ आमदार घेऊन त्यांना घरी का बसावं लागलं असतं? अशक्य ते शक्य करून दाखवलं, त्याला एक वर्ष झालं. अजून देखील काही स्वप्नं आहेत, ती साकार होताना चंद्रकांत दादांना प्रचंड पाहावी लागणार आहेत. चंद्रकांतदादांची वैफल्यग्रस्त, निराशाजनक मानसिकता आम्ही समजू शकतो. पण, सत्तेत येण्याची दिवास्वप्नं सोडून विरोधात आहोत हे सत्य त्यांनी स्वीकारावं,’ असा सल्ला रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

 

News English Summary: Is NCP MP Supriya Sule in a dream? Bharatiya Janata Party state president Chandrakant Patil had criticized in such words. NCP’s women state president Rupali Chakankar has given a strong reply to him. Speaking on this, Rupali Chakankar said, “Only the Pawar family has made the dream come true till today. Otherwise, Chandrakantdada would not have had to sit at home with 105 MLAs,” said Rupali Chakankar.

News English Title: NCP leader Rupali Chakankar reply to BJP state president Chandrakant Patil News updates.

हॅशटॅग्स

#NCP(351)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x