15 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

हिंदुत्वाचे पडसाद? खैरेंचे कट्टर समर्थक सुहास दाशरथेंचा भव्य कार्यक्रमात मनसेत प्रवेश होणार

Raj Thackeray, MNS, Suhas Dashrathe, HIndutva

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या मार्गाने जाणार असल्याच्या बातम्या पसरताच शिवसेनेला धक्के लागण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. केवळ मराठी केंद्रित राजकारणाचा मनसेला कोणताही राजकीय फायदा झालेला दिसत नाही. सध्याच्या राजकारणाचा विचार करता सत्तेसाठी कोणतेही पक्ष एकत्र आणि पक्षाची सर्व धोरणं वेशीवर टांगून सत्ता स्थापन करत आहेत. परंतु, यामध्ये मनसेला कोणताही राजकीय फायदा होताना दिसत नाही.

मात्र मनसे आता मराठीसोबत हिंदुत्वाचा अजेन्डा देखील हाती घेणार असल्याने शिवसेनेला सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. नुकतीच त्यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. सुहास दाशरथे मागील ३९ वर्ष शिवसेनेत कार्यरत असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. दाशरथेंचा मनसे प्रवेश हा खैरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असेल.

विशेष म्हणजे शिवसेनेला सत्तेत असतानाही धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इनकमिंगला जोरदार सुरवात झाली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसणार असून राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे प्रवेश करणार असल्याचे सुहास दशरथे यांनी स्पष्ट केले आहे. सुहास दशरथे हे शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभा संघटक आहेत. त्यांनी काल कृष्णकुंजवर जाऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी आपली भूमिका थोडीशी बदल हिंदुत्ववादी भूमिका करण्याकडे त्यांचा कल दिसत आहे. आगामी काळात या गोष्टीचा त्यांना फायदा होईल असे बोलले जात आहे.

शिवसेनेने कॉग्रेस-राष्ट्रवादी सोबत जात राज्याची सत्ता हस्तगत केल्यापासून काही जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. औरंगाबाद शिवसेनेतून त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली असून जुने कार्यकर्ते आणि सहसंपर्क प्रमुख असलेले सुहास दाशरथे लवकरच मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मागील ३९ वर्ष मी शिवसेनेत काम करत आहे, पण पक्षाकडून माझ्यावर सातत्याने अन्यायच होत गेला.

शिवाय हिंदुत्ववादी भूमिकेशी तडजोड करून शिवसेनेने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली हे देखील न पटण्यासारखे आहे. अशावेळी हिंदुत्वाची कास धरणाऱ्या मनसे आणि या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची खंबीरपणे साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णकुंज येथील भेटीत राज ठाकरे यांचे अभिनंदन केले, परंतु लगेच मनसेत प्रवेश करणार नाही. तर औरंगाबादेत भव्य कार्यक्रम घेऊन मनसेत प्रवेश करण्याचा विचार असल्याचे दाशरथे यांनी सांगितले.

 

Web Title:  Shivsena Aurangabad Leader Suhas Dashrathe going Meet MNS Chief Raj Thackeray.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x