30 June 2022 6:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
बहुमत चाचणी उद्याच घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश | तत्पूर्वी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार Motorola G42 | मोटोरोला जी 42 स्मार्टफोन भारतात लाँच होणार | 50 मेगापिक्सल कॅमेरा | किंमत आणि वैशिष्ठ्ये पहा Innova Captab IPO | इनोव्हा कॅपटॅप फार्मा कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या Horoscope Today | 30 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Drinking Water During Meals | या 5 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा | वाचा ती कारणं Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या फ्लोअर टेस्टवेळी भाजपला पाठिंबा देण्याच्या फडणवीसांच्या मागणीला राज ठाकरेंचा होकार
x

महिला अत्याचार गुन्हें, भाजप, शिवसेना, तृणमूल खासदार, आमदार आघाडीवर

नवी दिल्ली : एक लज्जास्पद गोष्ट अहवालात समोर अली आहे आणि ती म्हणजे देशात सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार आणि आमदार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये भाजपनंतर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे तर ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस तिसऱ्यास्थानी आहे.

आधीच जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणांमुळे सत्ताधारी भाजप अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे देशातील दोन्ही प्रकरणांचा संबंध भाजपच्या आमदारांशी जोडल्याने पक्षावर चारही बाजुंनी टीका होत आहे. त्यात आता ‘एडीआर’ म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एक अहवाल तयार केला आहे.

एडीआर ने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात भारतातील ५१ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यात भाजप आघाडीवर असून त्यांच्या १४ लोकप्रतिनिधी, शिवसनेच्या सात आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या सहा लोकप्रतिनिधीं विरोधात महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही अडचणीत सापडले आहेत.

‘एडीआर’ म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये विनयभंग, अपहरण, बलात्कार, वेश्या व्यवसायासाठी महिलांची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे असं स्पष्ट केलं आहे. एडीआरने संपूर्ण राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ५१ खासदार आणि आमदारांपैकी महाराष्ट्रातील १२ खासदार आणि आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. तर द्वितीय स्थानी पश्चिम बंगाल आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x