नवी दिल्ली : सध्या देशभरात लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्याचे प्रमाण #MeToo च्या माध्यमातून वाढीस लागलं आहे. अनेक सेलिब्रेटी याच्यात अडकल्यानंतर आता थेट मोदी सरकार मधील मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. याद्वारे अनेक महिला आपल्यावरील कथित अत्याचाराबद्दल जाहीरपणे बोलू लागल्या आहेत, त्यामुळे दाबून टाकलेली लैंगिक छळ प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.

चित्रपट श्रुष्टीतील अनेक मान्यवर व्यक्ती यात ओढल्या जात असताना आता पत्रकारीता आणि राजकीय क्षेत्रांमधूनही अशाप्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत असं चित्र आहे. #MeToo मोहिमेच्या जाळ्यात आता नवं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचं जोडलं गेलं आहे. व्यवसायाने ते माजी पत्रकार आणि संपादक राहिलेल्या या आरोपांचं गांभीर्य अधिकच गडद झालं आहे. समाज माध्यमाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अकबर यांच्यावर एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत.

या महिला पत्रकाराने आरोप करताना एक अनुभव सांगितला आहे, अकबर हे मुंबईतील हॉटेलच्या खोल्यांमध्ये मुलाखती घ्यायचे आणि दरम्यान ते त्याठिकाणी दारु पिण्याची ऑफर द्यायचे तसंच अशोभनीय वक्तव्य करायचे, असं तिने म्हटलं आहे. तसेच फोन करुन घाणेरड्या भाषेचा वापर करणं, अश्लिल मेसेज पाठवणं किंवा असभ्य कमेंट करणं यामध्ये अकबर हे मुरलेले आहेत, असा थेट आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अकबर यांनी माझ्या समोरही अत्यंत अश्लिल प्रस्ताव ठेवले होते, असा आरोप अन्य एका महिलेने केला आहे. १९९५ मध्ये कोलकाताच्या ताज पॅलेसमध्ये अकबर यांनी अश्लिल ऑफर दिली होती, त्यानंतर मी त्या नोकरीला नकार दिला होता असा खुलासा त्या महिलेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Central minister M J Akbar is now under scanner of MeeToo