1 May 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

युतीचे उद्योग म्हणजे लहानपणी पाहिलेला सर्कशीचा खेळ - रोहित पवार

Shivsena, bjp, uddhav thackeray, devendra fadnavis, ncp, rohit pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.

सध्या बदलत्या परिस्थिती नुसार उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं आहे आणि काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पाच वर्ष उद्धव ठाकरेंनी फक्त मगरीचे अश्रू ढाळले आणि मुद्दे सोडून वैयक्तिक टीका केली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी दरम्यान एकमेकांचे वाभाडे काढणारे सेना भाजप आज मांडीला मांडी लावून एकत्र प्रचार करत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे काळीज, कोथळा, वाघनखे, अफझल खान वगैरे वगैरे पण विकासाचे मुद्दे नक्कीच नाहीत.

युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देऊन किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होत आहे. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल, अशी टीका रोहित पवारांनी केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या