3 December 2021 1:08 AM
अँप डाउनलोड

Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता

Kangana Ranaut

मुंबई, २० सप्टेंबर | गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रणौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी कंगनाला वेळोवेळी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला आज २० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर ती आज न्यायालयात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू, असा अंधेरी कोर्टाकडून कंगणाला सूचक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज कंगना कोर्टात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे.

कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता – Bollywood lyricist Javed Akhtar defamation case against Kangana Ranaut to be issued arrest warrant if she fails to appear in court today :

आज अंधेरी कोर्टात सुनावणी:
जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात मानहाणीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते. १४ सप्टेंबरला याबाबत सुनावणी झाली असता कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळली. तिची कोविड चाचणी झाली. रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील ऍड सिद्दिकी यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील ऍड भारद्वाज यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर राहिली नाही तर आम्ही अटक वॉरंट काढू असे स्पष्ट शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. यामुळे आज कंगना कोर्टात हजर झाली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाण्याची शक्यता आहे. (Javed Akhtar defamation case against Kangana Ranaut)

काय आहे नेमके प्रकरण?
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली’, अशी तक्रार गीतकार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Bollywood lyricist Javed Akhtar defamation case against Kangana Ranaut to be issued arrest warrant if she fails to appear in court today.

हॅशटॅग्स

#KanganaRanaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x