26 September 2020 8:19 PM
अँप डाउनलोड

लोकसभा २०१९: सुषमा स्वराज निवडणूक लढवणार नाहीत!

इंदूर : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. इंदूरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच या निर्णयाची पूर्ण कल्पना मी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दिल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात. अनेक दिवसांपासून त्या प्रकृतीच्या कारणास्तव अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक त्या लढवतील की नाही याबद्दल खात्री नव्हती. त्यानुसार त्यांनी स्वतःच आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. परंतु पक्ष त्यांनी भविष्यात राज्यसभेवर पाठवू शकतो असं म्हटलं जात आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सांभाळताना त्यांना अनेकवेळा प्रकृतीच्या करणास्थाव इस्पितळात दाखल व्हावं लागलं होतं. सध्या मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे आणि पक्ष प्रचाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sushma Swaraj(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x